शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी ऊन कधी आणि कितीवेळ खावं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:19 IST

Vitamin D : व्हिटॅमिन डी मिळण्याचा मुख्य स्त्रोत सूर्यकिरणे असतात. त्यामुळे रोज काही वेळ तरी उन्हात बसणं महत्वाचं असतं.

Vitamin D : निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं किती गरजेचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर दिसतो. वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात. जे आपल्याला आहारातून मिळतात. यातील एक महत्वाचं व्हिटॅमिन म्हणज व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी मिळण्याचा मुख्य स्त्रोत सूर्यकिरणे असतात. त्यामुळे रोज काही वेळ तरी उन्हात बसण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच उन्ह कमी घेतल्याने सेराटोनिन हार्मोन लेव्हल कमी होते. ज्यामुळे तणाव आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.

उन्हामुळे रक्तात फॉस्फोरस आणि कॅल्शिअम रेग्युलेट होण्यास मदत मिळते. जे हाडे आणि रक्तासाठी महत्वाचे असतात. हिवाळ्यात तर लोकांना उन्ह इतकं आवडतं की, तासंतास ते उन्हात बसून राहतात. मात्र, उन्हामुळे जरी व्हिटॅमिन डी मिळत असेल तरी टॅनिंगचा धोकाही असतो. इतकंच नाही तर उन्हात जास्त वेळ राहिल्याने त्वचेवर सुरकुत्या, काळे डाग येण्याचा धोका असतो. अशात तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की, उन्हात कोणत्या वेळी आणि किती वेळ बसावं. जेणेकरून वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळेल.

शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की, ऑस्टियोपोरोसिस, कॅन्सर, डिप्रेशन, मसल्स वीकनेससहीत अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा शरीरात व्हिटॅमिन डी संतुलित प्रमाणात असणं गरजेचं असतं.

उन्हात बसण्याची योग्य वेळ

एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत उन्हात बसणे सगळ्यात चांगलं असतं. असं केल्याने शरीराला आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी मिळतं. मात्र, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ ही वेळ सगळ्यात फायदेशीर असते. हाडांच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी दुपारी उन्हात बसणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं.

किती वेळ बसावं उन्हात?

व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हात जास्तीत जास्त २० ते ३० मिनिटे इतकाच वेळ बसावं किंवा फिरावं. हार्ड स्कीन असलेल्या लोकांनी यापेक्षा जास्त वेळ उन्हात बसावं. ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात बसू नये कारण याने त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य