शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
4
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
5
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
6
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
7
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
8
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
9
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
10
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
11
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
12
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
13
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
14
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
15
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
16
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
17
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
18
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
19
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
20
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...

जीव वाचवणे कोणालाही शक्य आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 11:56 IST

हार्ट अटॅकचे म्हणजेच हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या एक किंवा अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे पहिले, ठळकपणे समजून येणारे लक्षण आहे सडन कार्डियाक अरेस्ट.

सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजेच जेव्हा अनपेक्षितपणे आणि अचानक हृदय धडधडणे थांबते तेव्हा शरीरातील मेंदूसहित सर्व अवयवांना पुरेसे रक्त मिळत नाही. हृदयातील खालील चेम्बर्स अतिशय वेगाने विस्कळीतपणे आखडले गेल्याने (इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीमध्ये वाढ ज्याला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असे म्हटले जाते) किंवा हृदयामध्ये प्रभावी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी होत नसल्यामुळे ही समस्या उद्भवते.

हार्ट अटॅकचे म्हणजेच हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या एक किंवा अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे पहिले, ठळकपणे समजून येणारे लक्षण आहे सडन कार्डियाक अरेस्ट. ज्या रुग्णांचे हृदयातील स्नायू कमजोर झालेले असतात, तसेच ज्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे अशा इतर गंभीर परिस्थितींमध्ये कार्डियक अरेस्ट होऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट होत आहे हे लगेच, त्याच क्षणी लक्षात आले नाही आणि त्या व्यक्तीला कार्डिओपल्मनरी रिससिटेशन (सीपीआर) दिले गेले नाही तर, अवघ्या काही मिनिटांमध्ये ती व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते.

कार्डियक अरेस्टमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो, त्यामुळे व्यक्ती अचानक बेशुद्ध पडते. त्याक्षणी त्या व्यक्तीजवळ असणारे किंवा अटेंडंट्स तातडीने ज्या कृती करतात त्यावर ती व्यक्ती जगणार की मरणार हे अवलंबून असते. या घटना शृंखलेला "चेन ऑफ सर्व्हायव्हल" असे म्हटले जाते, १९८९ मध्ये न्यूमॅनने पहिल्यांदा ही संज्ञा वापरली. तेव्हापासून आजतागायत अनेक आतंरराष्ट्रीय वैद्यकीय संघटना या संज्ञेचा वापर करत आहेत. 

"चेन ऑफ सर्व्हायव्हल" मधील लिंक्स पुढीलप्रमाणे असतात - 

१.    एखाद्या व्यक्तीला अचानक कार्डियक अरेस्ट होत आहे हे त्याक्षणी लक्षात येणे. ती व्यक्ती बेशुद्ध पडलेली असू शकते, श्वासोच्छवास आणि नाडीचे ठोके बंद पडलेले असू शकतात. ही स्थिती लक्षात येताच तातडीने मदत मागावी आणि आपत्कालीन रुग्णवाहिका बोलवावी. 

२.    जितक्या लवकर शक्य असेल तितके लवकर सीपीआर सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे, तसे केल्यास व्यक्तीचे प्राण वाचवले जाण्याची शक्यता तिपटीने वाढते. यामध्ये छातीच्या खालून तिसऱ्या हाडावर (स्टर्नम) किंवा छातीच्या मध्यभागी दोन्ही हातांच्या तळव्यांनी जोराने दाब दिला जातो (दर मिनिटाला १००-१२० वेळा दाबले जाते). त्यामुळे हृदयातून शरीरातील प्रमुख अवयवांना रक्तपुरवठा सुरु होऊ शकतो.   

३.    याखेरीज ऑटोमेटेड एक्स्टर्नल डीफिब्रिलेटर, प्रगत लाईफ सपोर्ट जर उपलब्ध असेल तर, आपत्कालीन रुग्णवाहिका आल्यावर मेडिकल प्रोफेशनल टीम त्याचा वापर करू शकते. आवश्यकता असेल त्यानुसार हॉस्पिटलमधील देखभाल व सहायता सेवा पुरवल्या जाव्यात.   

बहुतांश केसेसमध्ये कार्डियक अरेस्ट आलेल्या व्यक्तीचे जिवंत राहणे हे त्याक्षणी जवळ असलेल्या, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसलेल्या व्यक्तीने दिलेल्या सीपीआरवर अवलंबून असते. सध्याच्या काळात जीवनशैली बदलत आहे आणि युवकांमध्ये मधुमेहासारख्या कार्डियक धोका निर्माण करणाऱ्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये कार्डियक अरेस्टचे प्रमाण वाढले आहे. "सर्व्हायव्हल चेन" ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांना समजली पाहिजे, त्याक्षणी सीपीआर देण्यासारखे उपाय केले गेल्यास व्यक्तीचा जीव बचावला जाऊ शकतो. "जीव वाचवणे कोणालाही शक्य आहे" असे म्हणणे अतिशयोक्ती अजिबातच नाही.

(डॉ वेंकट डी नागराजन, कन्सल्टन्ट, कार्डिओलॉजिस्ट आणि इलेट्रोफिजिओलॉजिस्ट; हार्ट रिदम आणि कार्डियक डिव्हाईस सर्व्हिसेससाठी लीड, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य