शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विल स्मिथची पत्नी जेडा स्मिथ हिला नेमका कोणता आजार आहे? ऑस्करमधील घटनेमुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:26 IST

जेडानं हौस म्हणून किंवा एखाद्या चित्रपटासाठी टक्कल केलेलं नसून एका आजारामुळे तिची ही अवस्था झालेली आहे. जेडा स्मिथ सध्या अ‍ॅलोपेसिया (Alopecia) नावाच्या आजारानं त्रस्त आहे. Auto Immune प्रकारचा हा आजार आहे.

या वर्षीचे अ‍ॅकॅडमी अवॉर्ड्स (Oscars 2022) एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. अभिनेता विल स्मिथनं ऑस्कर वितरण सोहळ्यामध्ये कॉमेडियन क्रिस रॉकवर(Chris Rock) थेट स्टेजवर जाऊन हात उचलून खळबळ उडवून दिली. त्याचा VIDEO VIRAL झाला. यामागचं कारण होतं क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोवर केलेला विनोद. काय आहे हे नेमकं प्रकरण?

क्रिसनं विलची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची (Jada Pinkett Smith) खिल्ली उडवली होती. जेडा पिंकेट ही ख्रिस विलची बायको. तीसुद्धा अभिनेत्री आहे.पण काही काळापासून तिचे केस मोठ्या प्रमाणावर गळत आहेत. आता तर डोक्यावरील सर्व केस नाहीसे झालेले आहेत. या कारणावर क्रिसनं तिची खिल्ली उडवली. विल स्मिथला ही गोष्ट आवडली नाही. त्यानं स्टेजवरच क्रिसवर हात उचलला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींपासून ते टीव्ही प्रेक्षक आणि खुद्द क्रिस रॉकदेखील विल स्मिथच्या या वागण्यामुळे घाबरला.

जेडानं हौस म्हणून किंवा एखाद्या चित्रपटासाठी टक्कल केलेलं नसून एका आजारामुळे तिची ही अवस्था झालेली आहे. जेडा स्मिथ सध्या अ‍ॅलोपेसिया (Alopecia) नावाच्या आजारानं त्रस्त आहे. Auto Immune प्रकारचा हा आजार आहे.

अ‍ॅलोपेसिया किंवा अ‍ॅलोपेसिया अरेटा (Alopecia Areata) ही एक कॉमन ऑटोइम्युन कंडिशन आहे. जगभरातील अनेक लोक या आजारानं त्रस्त आहेत. यामध्ये रुग्णाच्या डोक्यावरील केस मोठ्या प्रमाणात गळतात. तज्ज्ञांच्या मते, अ‍ॅलोपेसिया असलेल्या काही व्यक्तींच्या फक्त डोक्यावरीलच सर्व केस गळतात (Hair Fall) तर काही लोकांच्या संपूर्ण शरीरावरील केस गळतात. अ‍ॅलोपेसिया अरेटा कोणत्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो. पण, ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना याचा धोका जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा आजार खूप लवकर वाढतो आणि काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात केसगळती होते. अ‍ॅलोपेसियानंग्रस्त असलेल्या पाचपैकी एका रुग्णाच्या कुटुंबातील आणखी एखाद्या सदस्यालाही हा आजार असतो. मानसिक तणावामुळे हा आजार होत असल्याचं म्हटलं जातं. परंतु, त्याबाबत अद्याप ठोस वैज्ञानिक पुरावे (Scientific Evidence) मिळालेले नाहीत. या आजारासाठी डॉक्टर कॉर्टिकोस्टेरॉईड्ससारखे (Corticosteroids) उपचार देतात.

५० वर्षीय जेडा पिंकेट स्मिथ अनेक वर्षांपासून अ‍ॅलोपेसियामुळे त्रस्त आहे. २०१८ मध्ये रेड टेबल टॉक सीरिजमध्ये तिन याबद्दल पहिल्यांदा खुलासा केला होता. ती म्हणाली होती, 'अनेक लोक मला विचारत आहेत की मी आजकाल डोक्याला स्कार्फ किंवा कापड बांधून का फिरते. मी आजपर्यंत याबद्दल बोललेले नाही. पण, आता मी त्याबद्दल सांगणार आहे. जेव्हा या आजाराचं निदान झालं होतं तेव्हा मी खूप घाबरले होते.' एकदा आंघोळ करत असताना तिचे जवळपास मूठभर केस हातात आले. या प्रकारानं ती घाबरली. आपल्याला टक्कल पडतं की काय? अशी भीतीही तिला वाटली होती. त्यानंतर ती सातत्यानं केस कापत आली, असंही जेडानं सांगितलं होतं.

२०२१ मध्ये, जेडा स्मिथनं इन्स्टाग्रामवर (Instagram) स्वतःचा एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. यामध्ये तिने लोपेसियाशी लढण्याचा कसा प्रयत्न केला, याबाबत सांगितलं होतं. तिच्या टाळूवर एक रेघ तयार झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं. केसगळतीच्या समस्येसाठी स्टेरॉईड इंजेक्शनदेखील (Steroid Injections) घेत असल्याचा खुलासा तिनं केला होता. इंजेक्शनमुळे आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी थोडीफार मदत मात्र नक्कीच होत असल्याचं तिनं सांगितलं होतं. आपल्या पत्नीच्या आजारपणाची क्रिस रॉकनं जाहीरपणे उडवलेली खिल्ली विल स्मिथला रुचली नाही म्हणून त्यानं ऑस्करच्या स्टेजवर क्रिसला मारहाण केली असावी.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स