शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी कसा नाश्ता करावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 11:52 IST

आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर नाश्ता किती गरजेचा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यासोबतच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल नाश्ता अधिक महत्वाचा ठरतो.

आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर नाश्ता किती गरजेचा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यासोबतच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल नाश्ता अधिक महत्वाचा ठरतो. प्रत्येकाला रोज हेवी आणि हेल्दी ब्रेकफास्टची गरज असते. तुम्हाला हेवी तर कळालं असेल पण हेल्दीबाबत कन्फ्यूज झाले असाल. 

जास्तीत जास्त लोकांचं असं मत असतं की, नाश्त्यात कॅलरी कमी असतात आणि यात जास्त फॅट नसतं. पण नाश्ता हेल्दी आहे की नाही हे मोजण्याची वेगवेगळी पद्धत आहे. चला जाणून घेऊ की हेल्दी नाश्ता काय आहे आणि त्याने तुम्ही केस फिट रहाल.हेल्दी ब्रेकफास्ट समजून घ्या.

(Image Credit : nypost.com)

सकाळच्या नाश्त्यामध्ये कॅलरी फार कमी असण्याची गरज नसते. वास्तविक पाहता तुमचा नाश्ता तुमच्या दुपारच्या जेवणापेक्षा अधिक पोट भरणारा असला पाहिजे आणि डिनरच्या तुलनेत अधिक कॅलरी असलेला असावा. नाश्त्यात फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे. पण याचा अर्थ हा नाही की, फॅट अजिबातच असू नये.

दुपारच्या जेवणापर्यंत हेल्दी नाश्त्याने तुमचं पोट भरलेलं असलेलं पाहिजे. केवळ चहा आणि बिस्कीटांऐवजी आणखीही काही हेवी पदार्थ खाल्ले पाहिजेत. भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त नाश्ता तुमचं वजन कमी करण्यात अडचण निर्माण करू शकतं. एक हलका नाश्ता लगेच पचेल आणि ब्लड शुगर लेव्हल कमी होईल.

मुळात हेल्दी नाश्ता तुम्हाला दिवसाची दमदार सुरूवात करण्यासाठी ऊर्जा देणारा असला पाहिजे. जे लोक हेवी आणि हेल्दी नाश्ता करून कामावर जातात ते काम करताना एनर्जेटिक राहतात.

कडधान्य असावेत

कोणतेही न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला नाशत्यात कार्ब आणि अनेक कडधान्यांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. कॉम्प्लेक्स कार्बमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि ब्लड शुगरचं प्रमाण योग्य ठेवण्यास मदत मिळते. 

पर्याय म्हणून तुम्ही नाश्त्यात दलिया किंवा ओट्सचा समावेश करू शकता. भरपूर कार्ब्स घेतल्याने तुम्हाला सतत भूक लागत नाही आणि सोबतच जास्त वेळ एनर्जी मिळते. नाश्त्यात ब्रेड, बिस्कीट आणि पावसहीत सर्वच प्रोसेस्ड किंवा रिफाइंड धान्य खाणं टाळलं पाहिजे.

फळांचा महत्वाचा वाटा

नाश्त्यातमध्ये हेल्दी पदार्थांसोबत काही फळांचाही समावेश करावा. कारण यातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटी-ऑक्सिडेंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स इत्यादी गोष्टी मिळतात. याने तुमची इम्यूनिटी मजबूत राहते. फळांमध्ये असलेली नैसर्गिक शुगर तुम्हाला एनर्जी देण्यासाठी मदत करते. ज्याने सकाळी तुम्हाला धावपळ करण्यासही एनर्जी मिळते. नाश्त्यात केळी, सफरचंद, पपई, द्राक्ष, डाळिंब इत्यादी फळांचा समावेश करावा.

नाश्त्यात दूध

काही लोक असा विचार करतात की, दूध गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेला पारंपारिक नाश्ता आहे आणि हा फार गरजेचा नाही. पण हा चुकीचा विचार आहे. कारण दुधातून तुम्हाला अनेक प्रकारचे डायट्री मिनरल्स मिळतात. त्यामुळे दुधाचा नाश्त्यात समावेश करावा.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स