शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

कधीच आजारी पडायचं नसेल तर वाचा पाणी पिण्याची योग्य पद्धत, 'हे' तर करूच शकता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 10:09 IST

पाणी पिणे ही सामान्य बाब वाटत असली तरी ही सामान्य बाब नाही. कारण तुमच्या गैरसमजामुळे तुम्ही आजारी पडू शकता. जर तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊ पाणी पिण्याची योग्य पद्धत...

(Image Credit : dailymail.co.uk)

तुम्हाला जर कुणी सांगितलं की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पिता तर तुम्ही म्हणाल यात कसली आली पद्धत? कारण साधारणपणे जास्तीत जास्त लोक ग्लासने किंवा बॉटलने गटागट पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पाणी पिण्याची हीच सवय चुकीची आहे. ही बाब वरवर जरी सामान्य वाटत असली तरी सामान्य अजिबात नाही. जर तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊ पाणी पिण्याची योग्य पद्धत...

चुकीच्या वेळेवर, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या प्रमाणात पाणी प्यायल्याने पोट दुखू शकतं, पचनक्रियेत समस्या होऊ शकते, डायबिटीसचा धोका राहतो, ब्लड प्रेशर, डोकेदुखी, जडपणा, किडनी समस्या आणि सुस्तीसारखी समस्याही होऊ शकतात. प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार सगळ्यांची पाण्याची गरज वेगवेगळी असू शकते, पण पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही आजारी पडू नये.

मेटाबॉलिज्म मजबूत होतं

(Image Credit : economictimes.indiatimes.com)

असे मानले जातात की, दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्यावे. कारण भरपूर पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्याने तुमची पचनक्रिया योग्य पद्धतीने होते. पाणी पित राहिल्याने शरीरात फॅट जमा होत नाही. सोबतच दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहिल्याने जास्त खाण्याची सवयही दूर होते. म्हणजे याचा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

काय आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत?

(Image Credit : heatherdane.com)

सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी आवर्जून प्यावे. आयुर्वेदानुसार, सकाळी काहीही खाण्यापूर्वी पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. असं केल्याने शरीरातून टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि शरीराची सफाई चांगली होते. सोबतच सकाळी अनोशा पोटी पाणी प्यायल्याने पोटदुखीपासूनही आराम मिळतो. तसेच जेवण केल्यावर साधारण ३० मिनिटेआधी पाणी प्यावे, याने जेवण सहजपणे पचतं. तसेच जेवण करताना आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर अर्धा तासानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

कधी पाणी पिणे फायदेशीर

(Image Credit : ayurtimes.com)

आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशरची समस्या राहत नाही आणि झोपण्याआधी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. एक्सरसाइज केल्यावर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.

असं अजिबात करू नका

(Image Credit : parenting.firstcry.com)

आयुर्वेदानुसार, पाणी शांतपणे खाली बसून आरामात प्यावे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. तसेच पाणी एकदाच गटागट करून पिऊ नये. एक एक घोट घेत हळू पाणी प्यावे. याचं कारण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य