शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

काय आहे Havana Syndrome, ज्यामुळे भारताची चर्चा जगभरात होत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 1:22 PM

अमेरिकन गुप्तचर एजन्सी CIA चे निर्देशक विलियम बर्न्स आपल्या अधिकाऱ्यांसोबत भारताच्या गोपनिय दौऱ्यावर आले होते.

न्यूजपासून सोशल मीडियापर्यंत आजकाल एका नव्या शब्दाची चर्चा सुरू आहे. तो शब्द म्हणजे हवाना सिंड्रोम (Havana Syndrome). भारतात हवाना सिंड्रोमची चर्चा तेव्हा झाली जेव्हा अमेरिकन मीडियाच्या रिपोर्ट्समध्ये खुलासा झाला की, भारतातून परतलेले अमेरिकन गुप्तहेर अधिकारी या रहस्यमय आजाराने ग्रस्त आढळून आले.

अमेरिकन एजन्सी CIA चे निर्देशक विलियम बर्न्स आपल्या अधिकाऱ्यांसोबत भारताच्या गोपनिय दौऱ्यावर आले होते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत अफगाणिस्तानच्या संकटावर चर्चा केली होती. CNN अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हवाना सिंड्रोम प्रमाणे दिसणाऱ्या लक्षणांमुळे अधिकाऱ्यांना मेडिकल मदत घ्यावी लागली.

का होतो हवाना सिंड्रोम?

हवाना सिंड्रोम एक अशा आजार आहे जो व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर हल्ला करतो. मात्र, आतापर्यंत या आजाराचे शिकार सामान्य लोक नाही तर खास लोकच झाले आहेत. यात मुख्यत्वे गुप्त विभाग आणि दूतावासाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

या रूग्णांना आजूबाजूला कोणताही गोंधळ नसताना अजब आवाज ऐकायला मिळतात. जसे की, धातु घासण्याचा आवाज, माशीचा आवाज, कठोर जागेवर छिद्र करत असल्याचा आवाज इत्यादी. याच्या इतर लक्षणांमध्ये चक्कर येणे, थकवा जाणवणे, जांभया येणे, डोकेदुखी होणे, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या, संतुलन बिघडणे यांचा समावेश आहे.

हवाना सिंड्रोमचं मूळ

हवाना सिंड्रोम सर्वात आधी क्यूबामध्ये आढळून आला होता आणि तिथेच याला हे नाव मिळालं. २०१६ मध्ये हवानामध्ये अमेरिकन दूतावासात काम करणारे काही कर्मचारी आणि गुप्तहेरांमध्ये सर्वातआधी याची लक्षणे आढळून आली होती. त्यांना डोकेदुखीसोबतच काही आवाज ऐकू येत होते. त्यांना ना झोप येत होती ना त्यांचं कोणत्या कामात लक्ष लागत होतं.

२०१८ मध्ये चीनमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यासोबतच इतरही देशांमध्ये CIA एजंट जिथे जिथे रशियन अभियान अपयशी करण्याच्या उद्देशाने काम करत होते, तेही या आजाराचे शिकार झाले होते.

कसा होतो हल्ला?

२०२० च्या National Academies of Sciences च्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेने मायक्रोवेव विकिरणला हवाना सिंड्रोमचं संभावित कारण मानलं आहे. या सिंड्रोमला सध्या एक सामूहिक मानसिक आजार मानला जात आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाIndiaभारतInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स