बरेच लोक तणाव कमी करण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करतात. गेल्या काही वर्षांमध्ये योगा आणि मेडिटेशन लोकप्रिय झाले आहे. या व्यतिरिक्त लोक वेगवेगळे योगसन आणि मेडिटेशन करतात. त्याचप्रमाणे, चॉकलेट मेडिटेशन हे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यास मदत करते.
चॉकलेट मेडिटेशन म्हणजे काय?चॉकलेट मेडिटेशन म्हणजे ध्यान लावण्यासाठी चॉकलेटचा उपयोग करणे होय. चॉकलेट मेडिटेशनसाठी अनेकजण डार्क चॉकलेट वापरतात. कारण त्याची चव आणि गंध फार स्ट्रॉंग असते. हे मेडिटेशन केल्याने सकारा्त्मक उर्जा निर्माण होते. मन आणि शरीर शांत केलं जातं.
- चॉकलेट मेडिटेशन करण्यासाठी, योगाच्या चटईवर शांत ठिकाणी बसा.
- आपल्या शरीराला आरामदायी करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि काही सेकंदांसाठी चॉकलेट पहा आणि त्याचा स्वाद जाणण्याचा प्रयत्न करा. यानंतर, नाकाजवळ चॉकलेट घ्या आणि सुगंध घ्या.
- आपल्या तोंडात चॉकलेटचा तुकडा ठेवा आणि त्याची चव आणि गंधाकडे लक्ष देऊन चॉकलेट खा.
- काही सेकंद दीर्घ श्वास घ्या आणि सामान्य स्थितीत परत या.
- आपण पुन्हा ही प्रक्रिया करा. हे मेडिटेशन केल्यानंतर, दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा सामान्य स्थितीत परत या.