(Image Credit : aliexpress.com)
गेल्या काही वर्षांमध्ये जिम जाण्याची चांगलीच क्रेझ वाढत आहे. प्रत्येकालाच फिट आणि हिरोसारखी बॉडी हवी असते. काही तरूणांवर तर हे भूत इतकं असतं की, ते दिवस दिवसभर जिममध्ये वेळ घालवतात. तर काही तरूणांवर जिमचा इतका प्रभाव असतो की, ते यामुळे तणावात राहू लागतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, तरूण बॉडी बनण्यामुळे फार जास्त तणाव घेतात.
नॉर्वेगन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सनुसार, बॉडी बनवण्याच्या तणावात तरूण अनाबोलिक स्टेरॉइड आणि सप्लिमेंट्सचं सेवनही जास्त करू लागतात. सप्लिमेंट्स घेतल्याने शरीरावर अनेकप्रकारचे नकारात्मक प्रभावही पडतात. हे नकारात्मक प्रभाव काय असतात हे जाणून घेऊया...
रिसर्चमधून धक्कादायक निष्कर्ष
या रिसर्चमधून समोर आलं आहे की, १० टक्के तरूण पुरूषांमध्ये आपल्या शरीराबाबत गैरसमज असतात. काही पुरूष ते नसतील तरी सुद्धा स्वत:ला फार जास्त लठ्ठ मानू लागतात. या कारणाने वजन कमी करणे आणि फिट राहण्यासाठी मेहनत करण्यासोबतच तणावही घेतात. रिसर्चमध्ये सहभागी तरूणांनी त्यांच्या शरीरासाठी गेल्या तीन वर्षांपासून डाएटही केली, जे लठ्ठपणाशी संबंधित नव्हती. अभ्यासकांनुसार, जास्तीत जास्त तरूण हे बॉडी इमेज डिसऑर्डरचे शिकार आढळले आहेत.
स्वत:च्या शरीरावर खूश नाहीत तरूण
बदलती लाइफस्टाइळ आणि समाजात ही समस्या आव्हान म्हणून समोर येत आहे. जास्तीत जास्त तरूणांमध्ये आपल्या शरीराबाबत अनेक प्रकारचे भ्रम आहेत. तरूण त्यांच्या फिटनेसबाबत संतुष्ट नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे सुशिक्षित लोकही या डिसऑर्डरचे शिकार होत आहेत.
काय आहे बॉडी इमेज डिसऑर्डर
एकप्रकारे हा इतरांच्या तुलनेत आपल्या शरीराला कमी समजण्याची किंवा आपल्या शरीरात कमतरता असल्याची भावना ठेवण्याचा हा एक मानसिक आजार आहे. पुन्हा पुन्हा आपलं शरीर आरशात बघणे आणि ते चांगलं करण्यासाठी अधिक मेहनत घेणे यासोबतच कॉस्मेटिक पदार्थांचं सेवन करणं याचाही समावेश आहे.
या समस्येमुळे अनेकजण फार सोशलही होत नाहीत. अशात ते तणाव आणि डिप्रेशनचे सुद्धा शिकार होऊ शकतात. तुलना आणि डाएटमध्ये बदल यामुळे शरीरात अनेकप्रकारचे बदल होतात. यामुळे डिप्रेशनची गंभीर समस्या होऊ शकते.
काय आहे उपाय?
जिमला जाण्याचं चलन किंवा बॉडी बनवण्याचं चलन यात कोणत्याही प्रकारची तुलना करू नये. जर तुमच्यातही याप्रकारची भावना असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. जे याचे शिकार झाले आहेत, त्यांना काउन्सिलिंगची गरज पडू शकते. डिप्रेशन आणि तणाव दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.