शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

वजन कमी करायचंय? 'या' सोप्या गोष्टीची लावा सवय...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:33 AM

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज केल्या जातात. धावणे, चालणे, योगा, सायकलिंग, अॅरोबिक्स अशा कितीतरी एक्सरसाइज सांगितल्या आणि केल्या जातात.

(Image Credit : quickanddirtytips.com)

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज केल्या जातात. धावणे, चालणे, योगा, सायकलिंग, अ‍ॅरोबिक्स अशा कितीतरी एक्सरसाइज सांगितल्या आणि केल्या जातात. या सगळ्या एक्सरसाइजने तुमचं आरोग्य चांगलं राहतं. पण अनेकांना या गोष्टी करणं शक्य होतंच असं नाही. तुम्हाला हेही माहीत आहे की, जास्तवेळ एकाच जागी बसून राहिल्याने आरोग्य बिघडतं आणि लठ्ठपणाही वाढतो. तसेच यापेक्षाही गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. पण फिट राहण्याची गरज तर आहेच. अशात एक अशीही एक्सरसाइज आहे, ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यात आणि फिट राहण्यासही मदत होते. ती एक्सरसाइज म्हणजे उभं राहणं. चला जाणून घेऊ याचे फायदे...

उभे राहण्याचे काय होतात फायदे? 

(Image Credit : trendsbuzzer.com)

वजन वाढण्याची शक्यता कमी

हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी

कंबरदुखीपासून आराम

फॅट बर्न

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बेस्ट एक्सरसाइज उभे राहणे

(Image Credit : nydailynews.com)

जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्ही बसण्याच्या तुलनेत अधिक कॅलरी बर्न करू शकता. कारण उभे राहण्यादरम्यान तुमचे मसल्स काम करत असतात. हीच स्थिती एक्सरसाइज दरम्यानही होत असते. याने वजन वाढण्याचा धोका कमी होतो आणि वजन नियंत्रणात राहण्यात मदत मिळते.

हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी

नेहमी एकाच जागेवर बसून राहिल्याने किंवा एकाच जागी बसून काम करत असाल तर लठ्ठपणा वाढण्याचा, पोट बाहेर येण्याचा धोका अधिक असतो. अर्थात लठ्ठपणा वाढला की, हृदयांसंबंधी समस्या वाढतात हे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. उभे राहिल्याने ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रणात राहतं. ज्यामुळे हृदयासंबंधी समस्यांचा धोकाही कमी असतो.

कंबरदुखीपासून मिळते सुटका

दर दोन तासांनी उभे राहिल्याने किंवा फोन बोलण्यासाठी उभे राहिल्याने तुम्हाला कंबरदुखीपासून सुटका मिळू शकते. जर तुम्ही कामाच्या ठिकाणी सिट-स्टॅंड डेस्कचा वापर करत असाल तर याचाही फायदा तुम्हाला मिळू शकतो.

फॅट बर्न करा

(Image Credit : .rd.com)

जास्त वेळसाठी तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहिल्याने तुमचं मेटाबॉलिज्म स्लो होतं. तेच जर तुम्ही उभे राहिलात तर तुमचं मेटाबॉलिज्म योग्य राहतं. ज्यामुळे शरीरात जमा झालेलं फॅट बर्न करण्यास मदत मिळते.

वरील काही फायदे हे जास्त वेळ उभे राहिल्याने शरीराला मिळतात. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत उभे राहण्याचा वेळ वाढवला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला फिट राहण्यास मदत होईल. पण वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाइजशिवाय पर्याय नाही हेही तितकंच खरं आहे.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स