शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डाएट शिवाय वजन कमी करण्याचा खात्रीशीर मार्ग आहे अधिक सोपा, घ्या जाणून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 17:32 IST

आज आम्ही तुम्हाला डाएट न करताही वजन कमी करण्याचे अनेक मार्ग सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

वजन कमी करण्यासाठी अनेकजण अनेक गोष्टी करतात. जेव्हा आपण काही किलो वजन कमी करण्याचा विचार करता, तेव्हा आपल्यासमोर दिसते ते डाएट. त्यासाठी आपण आपले आवडते पदार्थही सोडून देण्याची तयारी करतो. जरी आहार आपल्याला निरोगी वजन राखण्यास मदत करू शकतो, तरी इतर अनेक पर्याय आहेत जे आपल्या वजन कमी करण्यास मदत करू शकतात. आज आम्ही तुम्हाला डाएट न करताही वजन कमी करण्याचे अनेक मार्ग सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

डाएटशिवाय वजन कसे कमी करावे?वजन कमी करणे कठीण आहे हे मान्यचं पण समर्पण आणि लक्ष देऊन, आपण आपल्या आवडत्या स्वादिष्ट पदार्थांपासून दूर न जाताही वजन कमी करू शकता. कोणत्याही प्रकारचे डाएट न करताही आपले वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी काही खात्रीशीर मार्ग आहेत.

व्यायाम महत्वाचाआपण काही किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्यास शारीरिक क्रिया खूप महत्वाच्या आहेत. तुमच्या शरीराला तुम्ही खाल्लेल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न करणे आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली करण्या इतका दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. जर तुम्हाला चविष्ट खाणे सुरू ठेवायचे असेल, तर नियमित व्यायामाच्या रूटीनला चिकटून राहा.

जाणीवपूर्वक खाण्याच्या सवयींकडे लक्षजर, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडे नीट लक्ष दिले, तर कदाचित तुम्हाला तुमचे आवडते अन्न सोडावे लागणार नाही. आपण आपल्या पोटाच्या भुकेपेक्षा जास्त खात नाही ना, याची खात्री करा. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या मन भरेल इतके खाऊ नका. तर, तुमच्या पोटाची क्षमता विचारात घ्या.

अन्न नीट चावून खाअन्नाचे छोटे घास घ्या आणि ते व्यवस्थित चावून खा. यामुळे तुमच्या पचनाला फायदा होईलच, पण ते तुम्हाला अति खाणे टाळण्यासही मदत करेल. अन्न हळूहळू चावून खाल्ल्याने तुमच्या शरीरावर अन्न प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने होते आणि तुम्हाला इतर उच्च-कॅलरीयुक्त पदार्थांपासून दूर राहायला मदत होईल.

भरपूर पाणी प्याजास्त खाणे वजन कमी करण्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. हे टाळण्यासाठी, आपण नेहमी आपल्या जेवणापूर्वी भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे केवळ तुमची अन्नाची लालसा कमी होणार नाही, तर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले वाटेल, त्यामुळे तुम्ही कमी अन्न खाल.

तणाव पातळी कमी कराजास्त खाणे आणि अव्यवस्थित खाण्याच्या सवयीसाठी तणाव आणि चिंता यामुळे असू शकतात, ज्यामुळे वजन अवाजवी वाढू शकते. आपल्या शरीरात कोर्टिसोल नावाचे संप्रेरक असते, त्याचे असंतूलन झाले तर तुम्ही जास्त खाता, विशेषत: उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खात राहता. म्हणून, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही अलीकडे खूप वजन वाढवले ​​आहे, तर तुमच्या तणावाच्या पातळीवर लक्ष ठेवा आणि तुमचा मूड हलका करा. सकारात्मक गोष्टींमध्ये सहभागी व्हा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स