शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज करावी का? जाणून घ्या योग्य पद्धत....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 12:18 IST

Breakfast weight loss : नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. कारण वजन कमी करण्यात नाश्त्याची महत्त्वाची भूमिका असते.

Breakfast weight loss :  नाश्ता आणि वेट लॉस वर्कआउट यांचा एकमेकांशी संबंध असतो. ही बाब समजून घेण्यासाठी आपण आधी हे जाणून घेतलं पाहिजे की, नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. कारण वजन कमी करण्यात नाश्त्याची महत्त्वाची भूमिका असते.

नाश्त्याआधी एक्सरसाइजचे फायदे

रिकाम्या पोटी एक्सरसाइज करण्याचे अनेक फायदे आहेत. बॉथ विश्वविद्यालयात झालेल्या एका शोधानुसार, वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी केली जाणारी एक्सरसाइज जास्त फायदेशीर ठरते. 

तसेही तुम्ही नाश्त्याआधी एक्सरसाइज करता तेव्हा शरीरात जमा अतिरिक्त फॅट बर्न करण्यास मदत मिळते. नाश्त्याआधी एक्सरसाइज केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा किंवा त्रासाचा सामना करावा लागत नाही.

नाश्त्यानंतर एक्सरसाइज करण्याचे फायदे

जेव्हा आपण नाश्त्यानंतर एक्सरसाइजबाबत सांगतो तेव्हा समोर येतं की,  तुम्हाला कमजोरी जाणवत नाही. जे लोक हार्ड एक्सरसाइज करतात, त्यांना नाश्त्यानंतरच एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला जातो. कारण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यानंतर एक्सरसाइजचे फायदे कमी होतात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी कधी करावी एक्सरसाइज?

नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज कधी करावी? असाही एक प्रश्न अनेकांना पडतो. पण या प्रश्नाचं उत्तर अनेकदा लाइफस्टाईलवर अवलंबून असतं. याबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, व्यक्तीला ज्यावेळी एक्सरसाइज करणं चांगलं वाटतं, त्यावेळी त्यांनी एक्सरसाइज करावी.  काही लोकांना नाश्ता करण्याआधी एक्सरसाइज करणं जास्त सोपं वाटतं. तर काही लोकांना नाश्त्यानंतर एक्सरसाइजमध्ये जास्त ऊर्जा जाणवते.

या गोष्टींचीही घ्या काळजी

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नाश्ता केल्यानंतर एक्सरसाइज करायची असेल तर नाश्ता हलका करायला हवा. नाश्ता केल्यानंतर कमीत कमी एक तास कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करणे टाळावे. नाश्ता केल्यावरही स्वत:ला हायड्रेट करण्याचं काम करा.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्ता आणि एक्सरसाइजची योग्य पद्धत महत्वाची असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक्सरसाइज आणि नाश्त्याची निवड करावी.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य