शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या, दिसाल एकदम फिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:51 IST

Best Time To Drink Water To Lose Weight : वजन कमी करण्यादरम्यान जर योग्य वेळेवर पाणी प्यायलात तर बराच फायदा मिळेल. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ काय असते?

Know The Best Time To Drink Water To Lose Weight : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. अनेक लोक तर जेवण करणंच सोडतात तर काही लोक हिरव्या भाज्यांवरच राहतात. त्याशिवाय अनेक लोक तासंतास घाम गाळतात. अशात पाणी पिण्यावरूनही लोक खूप संभ्रमात असतात. पाण्याचं आणि वजन कमी करण्याचं कनेक्शन आहे. असं मानलं जातं की, वजन कमी करण्यादरम्यान जर योग्य वेळेवर पाणी प्यायलात तर बराच फायदा मिळेल. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ काय असते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माइं बूस्ट करण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत  पाणी पिण्याची योग्य वेळ असते. पाणी अनेक प्रकारे आपली मदत करतं. ज्याप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आजारात योग्य प्रमाणात पाणी आपली मदत करतं. जसं पचनात मदत करतं. पण हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही योग्य वेळेवर पाणी प्याल.

सकाळी उठताच पाणी प्या

सकाळी उठल्यावर पाणी पिणं फार गरजेचं असतं. अनेक रिपोर्ट्स आणि डायटिशिअननुसार, सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर असतं. कारण जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा शरीर डिहायड्रेट होतं. अशात सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि सोबतच पचनातही मदत मिळते. त्यामुळे कोणतंही दुसरं ड्रिंक घेण्याआधी एक किंवा दोन ग्लास नॉर्मल पाणी प्या.

- जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही पाणी प्यायला हवं. यावेळी पाणी प्यायल्याने तुम्ही चुकीचं काही खाणं टाळता. सोबतच कमी जेवण करता. डिहायड्रेशनमुळे नेहमीच तुम्हाला भूकेचे चुकीचे सिग्नल मिळू शकतात.

- अनेक एक्सपर्ट जेवण करण्याआधीही थोडं पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण जेवणाआधी पाणी प्यायल्याने तुमचं पोट भरतं आणि यामुळे तुम्ही जास्त खाणार नाही. भूक लागली की, बरेचजण जास्त खातात आणि याने वजन वाढतं. रात्री जेवणाआधी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.

- एक्सरसाइजआधी आणि नंतर पाणी पिणं फार गरजेचं आहे. याने तुम्ही हाय्रेट रहाल. एक्सरसाइज दरम्यान आपलं शरीर पिलेल्या पाण्याला घामाच्या रूपाने रिलीज करतं. अशात वर्कआउटनंतर तुम्ही पाणी पिणं गरजेचं असतं. 

या काही पाणी पिण्याच्या खास वेळा आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, फक्त याच वेळेवर पाणी प्यावं. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. ती शरीराची गरज आहे. ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

(टिप - वरील लेखातील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. हे सल्ले अनेक तज्ज्ञ वेळोवेळी देत असतात. मात्र, हे उपाय करण्याआधी एकदा तज्ज्ञांशी नक्की संपर्क करा. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. प्रत्येकाला हे उपाय सूट होतीलच असं नाही.) 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स