शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय करताय? वेळीच व्हा सावध, पडू शकतं महागात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 12:02 IST

Weight Loss Tips : अलिकडच्या वर्षांमध्ये लो-कार्ब डाएटची क्रेझ फार वेगाने वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी महिला लो-कार्ब डाएट अधिक फॉलो करतात. तुम्हीही लो-कार्ब डाएट घेत असाल तर तुम्हाला पुढील गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.

Weight Loss Tips  : लो-कार्ब डाएटचं चलन अलिकडच्या वर्षांमध्ये फार वेगाने वाढलं आहे. वजन कमी करण्यासाठी ही डाएट फॉलो केली जाते. पण यामुळे शरीरात होणारे बदल आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. जपानमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, अधिक लो-कार्ब डाएट घेतल्याने वय लवकर वाढतं आणि लवकर मृत्युचा धोकाही वाढतो. अलिकडच्या वर्षांमध्ये लो-कार्ब डाएटची क्रेझ फार वेगाने वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी महिला लो-कार्ब डाएट अधिक फॉलो करतात. तुम्हीही लो-कार्ब डाएट घेत असाल तर तुम्हाला पुढील गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.

काय सांगतो रिसर्च?

जपानी विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांचं मत आहे की, 'आतड्यांची चरबी घटवण्यासाठी आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी लो-कार्ब डाएट फायदेशीर असते. पण ही डाएट एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली करणे गरजेचं आहे'.

लो-कार्ब डाएटचे नुकसान?

वजन कमी करण्यासाठी लो-कार्ब डाएटचं सेवन करण्यासाठी फायदेशीर असते. पण जास्त काळासाठी सतत कार्बोहायड्रेटच्या कमी सेवनामुळे शरीरावर वाईट प्रभाव पडतो. चला जाणून घेऊ लो-कार्बने होणारे नुकसान..

लिव्हरसंबंधी समस्या

लिव्हर हा शरीरातील महत्वपूर्ण अवयव आहे. जास्त काळासाठी लो-कार्ब डाएट घेतल्याने लिव्हरसंबंधी समस्या होण्याचा धोका वाढतो. कार्बोहायर्डेटच्या कमतरतेमुळे लिव्हर फॅट आणि प्रोटीनपासून ग्लूकोज बनवू लागतो. ज्यामुळे शरीरात अमोनियाचं प्रमाण वाढतं. 

व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची कमतरता

शरीरासाठी सर्वच पोषक तत्वांचा समावेश असलेला आहार घेणे गरजेचं असतं. पण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त कमी कार्बोहायड्रेटचं सेवन केलं जातं तेव्हा शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळत नाहीत. या कारणामुळे शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता होते. त्यामुळे कॅल्शिअम, मॅग्नेशिअमची कमतरताही होते.

मांसपेशी होतात कमजोर

कार्बोहायड्रेटच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रोलाइटचं प्रमाणही कमी होतं. ज्यामुळे मासंपेशी कमजोर होऊ लागतात. आणि मांसपेशी कमजोर झाल्यावर अंगदुखी, जॉईंटमध्ये समस्या होऊ लागते.

मेंदूवरही पडतो वाइट प्रभाव

मेंदूच्या व्यवस्थित कार्यासाठी ग्लूकोजची गरज असते. शरीरातील ५० टक्के ग्लूकोज मेंदूद्वारे वापरलं जातं. शरीरात ग्लूकोज कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून वाढतं. आणि कमी कार्बोहायड्रेटमुळे मेंदूला आवश्यक तेवढं ग्लूकोज मिळू शकत नाही. सामान्यपणे सांगायचं तर एका हेल्दी व्यक्तीला १३० ग्रॅम कार्बोहायड्रेटची रोज गरज पडते.

हेल्दी कार्बोहायड्रेटसाठी काय खावं?

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि लो-कार्ब डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही डाएटमध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांचा समावेश करायला हवा. ब्राउन राइस, गव्हाचे पदार्थ, ज्वारी, बाजरा, डाळी यांमध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट असतं.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य