शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो हा खास मसाला, एकदा उपाय करून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 12:22 IST

Weight Loss Tips : काळं जिरं हे वेगवेगळ्या भाज्या किंवा पदार्थांमध्ये सर्रास वापरलं जातं. काळं जिरं हे जिऱ्याचंच एक रूप आहे. पण हे चवीला जरा कडवट असतं. हिवाळ्यात हर्बल औषधी म्हणून याचा वेगवेगळ्या आजारांना दूर करण्यासाठी वापर केला जातो.

Weight Loss Tips : किचनमधील वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये जिऱ्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे जिरं वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यातल्या त्यात काळं जिरं हे खासकरून वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हे तुम्ही जाणून घ्यायला हवं. 

काळं जिरं हे वेगवेगळ्या भाज्या किंवा पदार्थांमध्ये सर्रास वापरलं जातं. काळं जिरं हे जिऱ्याचंच एक रूप आहे. पण हे चवीला जरा कडवट असतं. हिवाळ्यात हर्बल औषधी म्हणून याचा वेगवेगळ्या आजारांना दूर करण्यासाठी वापर केला जातो. चला जाणून घेऊ या काळ्या जिऱ्याच्या मदतीने वजन कसं कमी केलं जाऊ शकतं.  

वजन करा कमी

तीन महिने काळं जिरं नियमित सेवन केलं तर शरीरात जमा झालेलं अनावश्यक फॅट दूर करण्यास मदत होते. काळं जिरं फॅटला नष्ट करून मलमूत्राच्या माध्यमातून शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतं. यामुळे तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता. तसेच यामुळे तुमचं वजनही कमी होतं. 

ही काळजी घ्या

जिरं हे गरम असतं त्यामुळे काळ्या जिऱ्याचा वापर एक दिवशी तीन ग्रॅमपेक्षा जास्त अजिबात करू नये. ज्या लोकांना जास्त गरमी होते, ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे, गर्भवती महिला यांनी अधिक काळजी घ्यावी. लहान मुलांनाही हे जिरं देणं टाळलं पाहिजे. लहान मुलांना १ ग्रॅमपेक्षा अधिक जिरं देऊ नये. गर्भवती महिलांना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनचा याचं सेवन करावं. जर तुम्ही काळ्या जिऱ्याचं सेवन करत असाल तर ते कोमट पाण्यात रात्री झोपण्यापूर्वी घ्यावं. म्हणजे जेवणाच्या दोन तासांनंतर याचं सेवन करावं आणि त्यानंतर कोणताही पदार्थ खाऊ नये. 

सामान्य जिऱ्याचे फायदे

वर्ल्ड हेल्थ फूडसच्या मते जिर्‍याचा आरोग्याच्या, पोषण मूल्यांच्या दृष्टीनं काय उपयोग आहे? ते पाहू. जिर्‍यामध्ये चांगल्या प्रमाणात लोह आणि काही प्रमाणात मॅगेनीज असतं त्यामुळे जिरं हा लोहाचा एक चांगला स्त्रोत आहे असं म्हणायला हरकत नाही. लोहाचा उपयोग रक्तातील हिमोग्लोबिनसाठी होतोच पण लोहामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते. स्त्रियांच्या बाबतीत दर महिन्याला होणार्‍या रक्तस्त्रावामुळे शरीरातील लोह कमी होत असल्यानं बारा ते पन्नास या वयोगटातील स्त्रियांसाठी जिरे खूप महत्त्वाचे ठरतात. वाढीच्या वयातील मुलांना, गरोदर स्त्रियांना, बाळंतिणींना अतिरिक्त लोहाची गरज असते. त्यांच्या दृष्टीनंही जिरं खूप महत्त्वाचं ठरतं. जिर्‍यामध्ये असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे ते पोटाच्या आणि यकृताच्या कर्करोगास प्रतिबंध करतं असं प्राण्यांवर केलेल्या प्रयोगामधून आढळलं आहे. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य