शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

पोटावरील चरबीचा घेर वाढतोय? सकाळच्या या 5 वाईट सवयी बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 3:15 PM

पोटाचा वाढता घेर, पोटावरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेत आहात का?

पोटाचा वाढता घेर, पोटावरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेत आहात का?. आहार आटोक्यात आणला, सकाळ-संध्याकाळ व्यायाम करत आहात, तरी सकारात्मक परिणाम दिसत नाहीयत. पण  हे सर्व करुन निराशा वाढवण्याऐवजी फक्त सकाळच्या सत्रातील काही वाईट सवयी बदलल्या तर वजन कमी करण्यासाठी नक्की फायदा होईल. वजन कमी करण्यासाठी पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक असते, याच गोष्टी मुलभूत आहेत असा अनेकांचा बऱ्याचदा समज होतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, यात काही वाद नाही. पण वजन घटवण्यासाठीचा हा काही नियम नाहीय. 

सकाळी उठल्यानंतर तुम्ही दिवसाची सुरुवात कशा पद्धतीनं करता यावरही तुमचे वजन वाढणे आणि घटणे अवलंबून असते आणि हे सर्व करताना योग्य ती पावलं उचलली गेली नाहीत, तर मग कदाचित पोटावरील अतिरिक्त चरबी घटवण्याच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहारात पूर्णतः बदल करण्याचीही आवश्यकता नाही. सकाळच्या सत्रातील काही सवयींमध्ये छोटे-छोटे बदल केल्यास वजन घटवण्यासंबंधीच्या तुमचे ध्येय नक्कीच गाठू शकता. सकाळी तुम्ही या पाच चुका करता, त्या करणं टाळा, तसे केल्यास नक्कीच शरीररचनेत बदल दिसून येईल. 

पाच चुका करणं टाळा1. सकाळी गरम पाणी न पिणंसकाळी ग्लासभर गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय, यामुळे शरीरातील विषारी द्रवपदार्थही बाहेर फेकले जातात व पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गरम पाणी पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते, चयापचय सुधारते आणि महत्त्वाचे म्हणजे रोग प्रतिकारकशक्तीदेखील वाढते. जेवणानंतर गरम पाणी प्यायल्यास जेवण सहजरित्या पचण्यास मदत होते. 2. स्ट्रेचिंग (Stretching) न करणे स्ट्रेचिंग करणं म्हणजे अंग ताणण्याचा व्यायाम सकाळी केल्यास शरीरासाठी अतिशय उत्तम ठरतो. यामुळे शरीरातील ताण-तणाव थकवा कमी होतो. शिवाय, शरीराची लवचिकताही वाढते आणि अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे शरीराचा आकार सुडौल व्हावा, असे वाटत असल्यास सकाळी नियमितरित्या स्ट्रेचिंग करावे. 

3. सकाळी उशिरा उठणेबऱ्याच जणांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. तात्काळ ही सवय बदला. कारण यामुळे तुमच्या वजन नियंत्रणावर परिणाम होत आहे. सकाळची कोवळी उन्हे अंगावर येऊ द्या. जी लोक कोवळी उन्हे अंगावर घेतात त्यांचे बॉडी मास इंडेक्स कमी प्रमाणात असते, अशी माहिती एका अभ्यासाद्वारे समोर आली आहे. फक्त 20 ते 30 मिनिटं कोवळी उन्हे अंगावर घ्या. यामुळे वजन नियंत्रणात येण्यास नैसर्गिकरित्या मदत होते.

4. सकाळचा नाश्ता न करणेसध्याच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात सकाळचा नाश्ता करणं बऱ्याच जणांना अशक्य होतं. मात्र सकाळचा पौष्टिक आहार असलेला नाश्ता अवश्य करावा. यामुळे शरीरातील साखरेची पातळी समप्रमाणात राहण्यास मदत होते व यामुळे शरीरातील ऊर्जा कायम राहते. दुपारी 12 वाजण्याच्या पूर्वी योग्य आहार घेतल्यास चयापचय प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. शिवाय, यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्याही निर्माण होणार नाही. 

5. वजन तपासून न पाहणेजी माणसं नियमित आपले वजन तपासून पाहतात त्यांचे वजन नियंत्रणात राहते, असे निरीक्षण Cornell University मधील संशोधकांनी नोंदवले आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराच्या वजनाची माहिती असणं देखील तितकंचे महत्त्वाचे आहे. नियमित सकाळी वजन तपासून पाहावे, जेणेकरुन आपल्याला आणखी किती प्रमाणात वजन नियंत्रणात आणायचे आहे, याची स्पष्ट कल्पना येईल.या पाच सवयींमध्ये बदल केल्यास पोटाचा घेर, त्यावरील अतिरिक्त चरबी घटवण्याच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स