शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Weight loss : अनेकदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीये? मग या सवयी सोडून पाहा; आपोआप वजन होईल कमी

By manali.bagul | Updated: February 23, 2021 10:39 IST

Easy Weight loss tips in Marathi ; तुम्ही जेवण बनवताना जास्त तेलाचा वापर करत असाल तर ही सवय आजचं  सोडा, कारण तेलात जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यात अडथळा येऊ शकतो.

सतत बसून काम केल्यानं, जास्त वेळ घरीच थांबल्यानं, शारीरिक हालचाल न केल्यामुळे अनेकांच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वाढत आहे. तुम्हीसुद्धा वाढतं वजन आणि लठ्ठपणानं ग्रासलेले असाल तर आज आम्ही तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहोत.  जास्तीत जास्त लोक रात्री जेवताना अनहेल्दी जेवणाचं सेवन करतात. त्यामुळे तुम्ही जास्त खाल्ले नाही तर ओव्हरवेट होऊ शकतं. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सगळं काही ट्राय केलं असेल आणि तरिही रिजल्ट मिळाला नसेल तर आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीनं वजन कमी करू शकता.

जेवणात तेलाचा अतिवापर  

जर तुम्ही जेवण बनवताना जास्त तेलाचा वापर करत असाल तर ही सवय आजचं  सोडा, कारण तेलात जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यात अडथळा येऊ शकतो.  जेवणात फॅट्सचे प्रमाण कमी केल्यानं वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

जेवणाआधी पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते. लोक सध्याच्या काळात पाणी पिण्याला खूप कमी महत्व देतात.  तरल पदार्थ फक्त आपल्याल हायड्रेट ठेवत नाही तर  शरीराला आवश्यक असलेले पोषक घटकसुद्धा  देतात. त्यासाठी जेवणानंतर ३० मिनिटांनी तसंच जेवणाआधी पाण्याचे सेवन करायला विसरू नका. 

जेवणाची वेळ ठरवून घ्या

सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपण्याच्या २ तास आधी  जेवून घ्या. जर तुम्हाला वेगानं वजन कमी करायचं असेल तर नियमितपणे तुम्हाला हे करायलाच हवं. काहीजण जास्त जेवण करून लगेच झोपतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. चिंताजनक! आधीपेक्षा अधिक वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; बचावासाठी CDC नं सांगितला प्रभावी उपाय

सकाळची सुरूवात चहाने करू नका

एका रिसर्चनुसार सकाळी सकाळी चहा प्यायल्यानं आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वजन कमी करण्याच्या मार्गात अडथळा येऊ शकतो. म्हणून कॅफेनचं सेवन करणं टाळा. वजन कमी करण्यासाठी सकाळी सकाळी गरम पाण्याचे सेवन करायला हवं त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

तुमचं वजन वाढण्याला भात जबाबदार आहे का?

भातात कार्ब्स अधिक, फायबर कमी...

medicalnewstoday.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, यात जराही शंका नाही की, तांदूळ खासकरून पांढरे तांदूळ (White Rice) रिफाइंड असतात. यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं. यातील फायबरही भात शिजवताना नष्ट होतात. रिफायनिंगची प्रक्रियादरम्यान फायबर नष्ट झाल्याने भाताचा ग्लायसिमिक इंडेक्स वाढतं. हेच कारण आहे की, जर फार जास्त प्रमाणात भाताचं सेवन केलं तर निश्चितपणे लठ्ठपणा आणि अनेक प्रकारच्या क्रॉनिक आजारांचा धोका असतो. 

डाळ, भाजी आणि तूप घालून खावा भात

अनेक हेल्थ एक्सपर्ट आणि न्यूट्रिशिअन वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये डाळ-भात (Dal and Rice) खाण्याचा सल्ला देतात. मात्र, डायटिशिअन आणि न्यूट्रिशनिस्ट यांच्यानुसार, तांदळाच्या सिंगल पॉलिश्ड व्हरायटीचं सेवन करायला हवं. सोबतच केवळ भात खाण्याऐवजी, भातात प्रोटीन असलेली डाळ, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेल्या भाज्या आणि तूप घालून खावा. असं केल्याने तुमच्या शरीरालाही भातातील कार्ब्ससोबतच आवश्यक प्रोटीन आणि इतर न्यूट्रिएंट्सही मिळतील. याने वजन वाढण्याचा धोका राहणार नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स