३९ हजार बालकांचे वजन घटले १६७० बालक धोकायदायक स्थितीत : कमी व अतितीव्र कमी वजनाचे ३७ हजारावर बालक
By Admin | Updated: March 14, 2016 00:20 IST2016-03-14T00:20:18+5:302016-03-14T00:20:18+5:30
विलास बारी

३९ हजार बालकांचे वजन घटले १६७० बालक धोकायदायक स्थितीत : कमी व अतितीव्र कमी वजनाचे ३७ हजारावर बालक
व लास बारीजळगाव : सदृढ व सशक्त पिढीच्या निर्माणसाठी शासनाने ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारत कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न केले आहे. मात्र महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती जिल्हाभरातील दोन लाख ९४ हजार ६९० बालकांपैकी ३९ हजार २९४ बालकांचे वजन हे कमी आढळून आले आहे. त्यात धोकादायकस्थितीत असलेल्या सॅम व मॅम बालकांची संख्या ही १६७० इतकी आहे.तीन हजार ७२४ अंगणवाडीमध्ये घेतले बालकांचे वजनमहिला व बालकल्याण विभागातर्फे शून्य ते ६ या वयोगटातील बालकांचे वजन घेण्यात आले. जिल्हाभरातील तीन हजार ७२४ अंगणवाडी केंद्रांमध्ये दोन लाख ९४ हजार ६९० बालकांना आहार पुरविण्यात येत आहे. त्यापैकी अंगणवाडी सेविकांमार्फत दोन लाख ६८ हजार ७४६ बालकांचे वजन घेण्यात आले.जिल्हाभरात २५२ सॅम बालकअंगणवाडी सेविकांतर्फे ज्या बालकांचे वजन घेण्यात आले, त्यात तब्बल २५२ बालक हे सॅम गटात आढळून आले. तर एक हजार ४१८ बालक हे मॅम गटात आढळून आले आहेत. अमळनेर,बोदवड, चोपडा, धरणगाव, जामनेर, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये या बालकांची सर्वाधिक संख्या आहे. तर बोदवड, जळगाव, मुक्ताईनगर, पाचोरा व यावल या तालुक्यांमध्ये मॅम बालकांची सर्वाधिक संख्या आहे.अति तीव्र कमी वजनाची पाच हजार २७४ बालके अंगणवाडी सेविकांनी केलेल्या वजनादरम्यान ३२ हजार ३५० बालक हे कमी वजनाची आढळून आली आहेत. तर अति तीव्र कमी वजनाची पाच हजार २७४ बालके आढळून आले आहेत.११२० बालकांमध्ये सुधारणाअंगणवाडी सेविकांतर्फे घेण्यात आलेल्या वजनात सॅम व मॅम बालकांना व्ही.सी.डी.सी तसेच एन.आर.सी.द्वारे उपचार व आहार पुरविण्यात येत असतो. या माध्यमातून एक हजार ८६ सॅम बालकांमध्ये तर एन.आर.सी.मधील २९ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या बालकांना अंगणवाडी तसेच आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली ठेवून नियमित आहार पुरविण्यात येत असतो.