(Image Credit : Medical News Today)
हिवाळा असो वा उन्हाळा लोक मोज्यांचा वापर करतातच. शाळेत जायचं असेल तर मोजे घालतात, ऑफिसला जायचं असेल तर लोक मोजे घालतात. पण हिवाळ्यात जास्तीत जास्त वेळ मोजे घालणे आणि उन्हाळ्यात जास्त वेळ मोजे घालणे यात बराच फरक आहे. फार जास्तवेळ मोझे घालून राहणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. खासकरून उन्हाळ्यात. काही फारच टाइट मोजे वापरतात त्यामुळे वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
ब्लड सर्कुलेशनवर पडतो प्रभाव
जास्त टाइट मोजे घातल्याने पायांना सूज येण्याची समस्या होऊ शकते. तसेच पायांमध्ये ब्लड सर्कुलेशनही कमी होऊ लागतं. याने अस्वस्थता आणि शरीरात अचानक उष्णता जाणवू शकते. जर तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत मोजे काढत नसाल पाय सुन्न झाल्यासारखं वाटू शकतं.
पायांची त्वचा होते खराब
काही लोक कॉटनचे मोजे वापरत नाहीत. तर अनेकजण कापड न बघता स्वस्त मोजे वापरतात. याने पायांची त्वचा खराब होऊ शकते. उन्हाळ्यात सतत पायात मोजे घालून राहिल्याने पायांना घाम येऊ लागतो. तळपायाला अजिबातच हवा लागत नसल्याने अधिक घाम येतो, याने ओलावा तयार होतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शनची समस्या होऊ शकते आणि त्वचा खराब होऊ लागते. अशावेळी मोज्यांची क्वालिटी बघणे महत्त्वाचे ठरते.
एडीमा होऊ शकतो
शरीराच्या एका भागात तरल पदार्थ एका जागेवर जमा होणे आणि त्या भागावर सूज येणे हे एडीमाचं लक्षण आहे. तसेच फार जास्त वेळ एकाच जागेवर आणि एकाच प्रकारे बसणे किंवा उभे राहण्याने पाय सुन्न होण्याची तक्रार होऊ शकते. जर तसं न होता पाय सुन्न होत असतील तर ही समस्या मोज्यांमुळे झालेली असू शकते.
फंगल इन्फेक्शनचा धोका
पायांमधून निघणारा घाम मोजेच शोषूण घेतात. जास्तवेळ मोजे घालून राहिल्याने किंवा टाइट मोजे घातल्याने घाम निघून जात नाही. याने ओलावा तयार होऊन मोज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू होऊ शकता. ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.