शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात दिवसभर सॉक्स घालून असता? जाणून घ्या गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:27 IST

Health Tips : दिवसभर सॉक्स घालणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात उन्हाळ्यात सॉक्सचा अधिक वाईट प्रभाव पडतो. इतकंच नाही तर अनेकजण झोपतानाही मोजे वापरतात.

Health Tips : अलिकडे चपलांऐवजी शूज घालण्याची पद्धत अधिक वाढली आहे. शूज आला की, लोक सॉक्सही घालतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, दिवसभर सॉक्स घालणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात उन्हाळ्यात सॉक्सचा अधिक वाईट प्रभाव पडतो. इतकंच नाही तर अनेकजण झोपतानाही मोजे वापरतात. हेही चुकीचे आहे. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात सतत सॉक्स वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात.

रक्त संचार प्रभावित होणे

शरीराच्या प्रत्येक अंगाला रक्ताची गरज असते. घट्ट मोजे घातल्याने पायांच्या नसा दबल्या जातात. त्या दबलेल्या नसांमध्ये योग्यप्रकारे रक्त संचार होत नाही. याकारणाने पूर्ण शरीरातील रक्त संचार प्रभावित होतो. यामुळे पायांचा त्रास वाढतो. पाय दुखायला लागतात. 

एडीमा होऊ शकतो

शरीरातील एखाद्या भागात तरल पदार्थ जमा होणे आणि त्या जागेवर सूज येणे हे एडीमाचे लक्षण आहे. ही सूज हळूहळू वाढू लागते. यामुळे पाय सुन्न होतात. ही बाब फार गंभीर आहे. वेळीच डॉक्टरांची सल्ला न घेतल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो.

फंगल इन्फेक्शनचा धोका

पायातून येणारा घाम मोज्यांमध्ये मुरतो. पण जास्तवेळ मोजे तसेच घालून ठेवल्याने मोज्यामधील घाम पूर्णपणे कोरडा होत नाही. त्या मोज्यांमध्ये ओलावा असल्याने त्यात बॅक्टेरिया आणि विषाणू होतात. याच कारणाने फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.

अशी घ्या काळजी

डॉक्टर लहान मुलांना नेहमीच जरा मोठे मोजे घेण्याचा सल्ला देतात. सिंथेटीकचे मोजे वापरण्यापेक्षा सूती कापडाचे मोजे वापरावे. तसेच वेळ मिळाला तर शूज काढून मोजेही काढा आणि पायांना हवा लागू द्या. याने पायांच्या त्वचेचे पोल्स उघडतील आणि त्वचेला हवा मिळेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य