लहान मुलं डायबिटीसचे शिकार होण्याआधी अशी घ्या काळजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 10:11 AM2020-01-01T10:11:13+5:302020-01-01T10:18:36+5:30

सध्याच्या काळात अनियमित जीवन शैली आणि वातावरणातील बदलामुळे लहान मुलांच्या  आरोग्यावर नकारात्मक परिणाम  होत असतो.

Ways of care before children suffer from diabetes | लहान मुलं डायबिटीसचे शिकार होण्याआधी अशी घ्या काळजी 

लहान मुलं डायबिटीसचे शिकार होण्याआधी अशी घ्या काळजी 

Next

सध्याच्या काळात  अनियमित जीवन शैली आणि वातावरणातील बदलामुळे लहान मुलांच्या  आरोग्यावर नकारात्मक परिणाम  होत असतो. मुलांचा इंटरनेटचा अतिवापर तसंच खाण्यापिण्याच्या बाबतीत असणारा निष्काळजीपणा त्यांना महागात पडू शकतो.  सर्वसाधारणपणे मोठ्या वयोगटातील लोकांना जे आजार व्हायचे ते आता लहान मुलांना सुद्धा होतात. अतिशय कमी वयात उद्भवणारे हे जीवघेणे आजार मुलांचे भवितव्य धोक्यात आणत आहे. 

मधूमेह या रोगाचं नाव ऐकून असा समज तयार होतो की  हा आजार फक्त जास्त वयाच्या लोकांमध्येच होतो. पण असं नसून  हा आजार लहान मुलांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणावर होत आहे. लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस हा टाईप १ डायबिटीस असतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. जाणून घ्या लहान मुलांमध्ये होत असलेल्या डायबिटिसचं प्रमुख लक्षणं काय आहेत.

लहान मुलांना थकवा जाणवतो

डोकेदुखी होते

जास्त  तहान  लागणे

जास्त भूक लागणे

पोटात दुखणे 

वजन अचानक कमी होणे 

रात्रीच्या वेळी सतत लघवीला येणे

प्राईवेट पार्टसवर खाज येणे 

जास्तवेळ थंडीच्या वातावारणात राहिल्यामुळे इम्यून सिस्टीम रोगांचा सामना  करण्यासाठी एंटीबॉयटिक चे उत्पादन करते. त्यामुळे इंसुलीनचे प्रमाण कमी होते आणि मधूमेह होण्याचा धोका अधिक असतो. तसंच काहीवेळा वायरल इन्फेक्शनमुळे सुध्दा डायबिटीस टाईप १ होण्याचा धोका अधिक असतो.  शारीरिक हालचाल कमी केल्याने सुध्दा अशा प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो.  जास्त खाल्ल्यामुळे तसंच कार्बोहायड्रेट्स अति प्रमाणात शरीरात असल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. तर काही वेळेला अनूवांशिकतेमुळे सुध्दा डायबिटिस टाईप १ होऊ शकतो. चॉकलेट्स कुकीज आणि कोल्डड्रिंक्सच्या अतिसेवनाने समस्या वाढू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी मुलांनी तसंच पालकांनी घेणं गरजेचं आहे.

डायबिटीस टाईप१ पासून बचाव करण्यासाठी उपाय

लहान मुलांनी रोज २ ग्लास दूध घेणं गरजेचं आहे. दुधात कार्बोहायड्रेटस असतात. ते रक्तातील  साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. मुलांच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करायला हवा. आहारात डाळींचा समावेळ असावा. पपई. सफरचंद, पेरू डाळिंब या फळांचं सेवन करायला हवं. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास या आजारांपासून दूर राहता येतं. 
 

Web Title: Ways of care before children suffer from diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य