(Image Credit : www.olgasflavorfactory.com)
अनेकांचा असा समज असतो की, भात अधिक खाल्लाने वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढलेले लोक किंवा वजन वाढण्याची भिती असणारे लोक भातापासून दोन हात दूरच राहणे पसंत करतात. पण मुळात असं नाहीये. योग्य पद्धतीने भात शिजवला तर भाताने वजन वाढत नाही. तज्ज्ञांनुसार, भातामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी असतात. ज्यामुळे वजन वाढतं. भात हा भारतात आवडीने खाल्ला जाणार पदार्थ आहे. पण अनेकजण यापासून दूर राहतात. जगभरात तांदळाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे हे दिसून येतं की, जगभरातील लोक भाताचे दिवाने आहेत. पण जर तुम्हाला वजनही कमी करायचंय आणि भातही खायचाय, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास पद्धत सांगणार आहोत.
अशा कमी करा भातातील कॅलरी
प्रश्न हा आहे की, कशाप्रकारे तांदूळ शिजवल्यावर त्यातील कॅलरी कमी केल्या जातील? अभ्यासकांनुसार, यासाठी कोणत्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरीच हे काम करू शकता. त्यासाठी अर्धी वाटी पांढरे तांदूळ घ्या, त्यात एक चमचा खोबऱ्याचं तेल टाका. त्यानंतर हे उकडलेल्या पाण्यात टाका. नंतर उकडलेल्या पाण्यात हे तांदूळ ४० मिनिटे शिजवा. तांदूळ शिजल्यावर भात १२ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर तुम्ही हा भात थंड किंवा हलका गरम करून खाऊ शकता.
कशा कमी झाल्या कॅलरी?
वर सांगितल्या प्रमाणे तांदूळ शिजवल्यास भातातील कॅलरी कमी होतात. तज्ज्ञ सांगतात की, अशाप्रकारे तांदूळ शिजवून जेव्हा थंड केले जातात तेव्हा यातील ग्लूकोज मोलिक्यूल्स टाइट बॉंड्स तयार करतात. यालाच रेसिस्टेंट स्टार्च म्हटले जाते. म्हणजे अशाप्रकारे तांदूळ शिजवल्याने आपली पचन संस्था याला पूर्णपणे शोषूण घेत नाही, म्हणजे सर्वच कॅलरी ग्रहण होत नाहीत. म्हणजे एकंदर काय होतं की, यात असलेल्या तत्त्वांचा स्विकार आपलं शरीर करत नाही. अशाप्रकारे हा भात आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
खोबऱ्याच्या तेलाची भूमिका
अशाप्रकारे शिजवण्यात आलेल्या तांदूळामध्ये खोबऱ्याच्या तेलाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. खरंतर खोबऱ्याच्या तेलामध्ये मीडियम चेन फॅटी अॅसिड असतं. हे इतर फॅटी पदार्थांच्या तुलनेत चांगलं असतं.
किती फायदेशीर?
तांदूळ शिजवण्याची ही पद्धत सामान्य पद्धतीपेक्षा १० पटीने चांगली आणि फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या पद्धतीने तुमच्या शरीरातील ६० टक्के कॅलरी कमी होतात. अभ्यासकांच्या टीमने सांगितले की, हा शिजवलेला भात पुन्हा गरम केला तरी सुद्धा यात कॅलरीची संख्या वाढत नाही.