शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

डायटिंगने वजन कमी करायचं असेल तर आधी बीएमआर काय आहे समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 10:46 IST

Weight Loss : हे समजून घ्यायला पाहिजे की, आपण जे खातो त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. या ऊर्जेलाच कॅलरी म्हटलं जातं. ज्याने शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुरळीत चालतात.

Weight Loss : वजन वाढलेल्या अनेकजणांचा असा समज असतो की, डायटिंग केल्याने वजन कमी होतं. पण याबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमजही असतात. उठलं आणि डायटिंग सुरू केलं असं करून फायद्याऐवजी नुकसानच होतं. हे समजून घ्यायला पाहिजे की, आपण जे खातो त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. या ऊर्जेलाच कॅलरी म्हटलं जातं. ज्याने शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुरळीत चालतात. त्यामुळे आहार कोणत्याही परिस्थितीत सोडता येत नाही. कारण आहार हाच जीवनाचा आधार आहे. कॅलरी या मानवी शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आहे. जे शरीराच्या प्रक्रियांसाठी गरजेचं असतं आणि कॅलरी आहाराच्या माध्यमातून मिळतात. 

डायटिंगआधी हे महत्त्वाचं

अनेकजण कुणीतरी कुणाच्यातरी सांगण्यावरून डायटिंगच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण डायटिंग सुरू करण्याआधी एखाद्या एक्सपर्ट किंवा डायटिशिअनचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं ठरतं. अनेकदा डायटिंगच्या दरम्यान शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता होते आणि डायटिंगचा प्रभाव उलटा होतो. याप्रकारच्या डायटिंगने वजन कमी होत नाही आणि नकळत तुम्ही घरबसल्या वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देता. त्यामुळे स्वत:च्या मनाने डायटिंग करू नका. 

बीएमआर रेटनुसार डाएट

डायटिंग करायची असेल तर डायटिंगआधी बीएमआर म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट समजून घेणे महत्त्वाचे आहे. बीएमआर कॅलरी ते प्रमाण आहे ज्याची शरीराला गरज असते. तज्ज्ञ लोक बीएमआर रेट जाणून घेतल्यावरच तुम्हाला कोणत्याप्रकारची डाएट द्यायची हे ठरवतात. 

उपाशी राहिल्याने वजन वाढतं

उपाशी राहून वजन कधीच कमी होत नाही. उलट उपाशी राहणे लठ्ठपणाचं कारण ठरतं. एक गोष्ट आणखी समजून घेणे गरजेचे आहे की, शरीरातील चरबी कमी करण्यासाठीही शरीरात कॅलरीची गरज असते. त्यामुळे डायटिंग तज्ज्ञांच्या देखरेखीतच झाली पाहिजे. 

कॅलरी गरजेच्या

जर तुम्ही उपाशी रहाल तर तुमच्या शरीरात कॅलरी तयारच होणार नाहीत तर बर्न कशा होतील. त्यामुळे योग्य प्रमाणात अन्न खाणं आवश्यक असतं. जास्त किंवा विनाकारण खाणं टाळलं पाहिजे. कारण जास्त कॅलरी तुम्ही ग्रहण कराल तर त्या बर्न करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची डायटिंग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला गरजेचा ठरतो. 

(टिप : वरील लेखात सांगण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ माहितीसाठी आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फिटनेस प्रोग्रॅम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य