शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

निरोगी राहायचेय?- एक साधी गोष्ट तपासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 11:19 IST

Health Tips: जीवनशैलीमुळे होणारे आजार हा सध्याच्या पिढीला ऐकावा लागणारा नेहमीचा वाक्प्रचार. जीवनशैली नावाच्या या अदृश्य जादूच्या पेटाऱ्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, असा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का? त्याची उत्तरे इतकी सोपी दिसतात की त्यामुळे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात ते खरे वाटणार नाही. 

 - वंदना अत्रे(दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)जीवनशैलीमुळे होणारे आजार हा सध्याच्या पिढीला ऐकावा लागणारा नेहमीचा वाक्प्रचार. जीवनशैली नावाच्या या अदृश्य जादूच्या पेटाऱ्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, असा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का? त्याची उत्तरे इतकी सोपी दिसतात की त्यामुळे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात ते खरे वाटणार नाही. 

काय आहे या पेटाऱ्यात? तुमचा आहार, त्याच्या वेळा,  खाण्याच्या पद्धती, त्यामागे असलेले प्रयत्न आणि त्याचे पोषण मूल्य, तुमची विश्रांती, स्क्रीन टाइम, तुमचा विरंगुळा, मित्रांशी होणारा संवाद, व्यायाम आणि असे बरेच काही. या गोष्टी आपल्या दैनंदिन जगण्याशी जोडलेल्या आहेत. आणि वरवर बघता अगदी किरकोळ, बिन महत्त्वाच्या वाटाव्या अशाही. पण त्या आपल्या आयुष्यात छोटे छोटे तणावाचे अनेक क्षण आणत असतात. याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपले आरोग्य कसे राहणार हे ठरवत असतात. करिअर किंवा नोकरी आणि तिथली जबाबदारी याच्यापुढे आपल्यासाठी जेवण ही कायमच दुय्यम, बिनमहत्त्वाची बाब असते. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत पहिला बळी जातो तो जेवणाचा आणि विश्रांतीचा. अशी आणीबाणी चार-सहा महिन्यांतून एकदा येणे समजू शकते. पण दिनक्रमाला शिस्त नसल्याने दर दोन चार दिवसांनी आणीबाणी यायला लागली आणि दरवेळी आपल्या आहाराचा, विश्रांतीचा बळी जाऊ लागला तर त्याचा निव्वळ शरीरावर नाही स्वास्थ्यावर अधिक परिणाम होतो. मन सतत ताणात राहू लागते. दिनक्रमाला शिस्त का नाही याचा शोध घेताना पहिले कारण दिसते ते सोशल मीडिया किंवा रात्री उशिरापर्यंत डोळ्यापुढे सतत चालू असणाऱ्या स्क्रीनचे. त्यामुळेच सगळे मानसशास्त्रज्ञ आणि लाइफ कोच म्हणवणारे गुरू एकच गोष्ट आवर्जून सांगतात,

निरोगी राहायचे असेल तर दिनक्रम तपासून बघा. कोणत्या गोष्टीला तुमच्या आयुष्यात महत्त्व आहे ते तपासून बघा. त्यात आपल्या अनारोग्याची बीजे दिसतील. अशावेळी नेहमी मला माझे नोकरीचे दिवस आठवतात. कधीही वेळेवर न झालेले जेवण, दिवसभराचा ताण घालवण्यासाठी संध्याकाळी जंक म्हणावे असे काहीतरी तोंडात टाकत घालवलेला स्क्रीन टाइम हे सगळे आठवते... आणि आठवतो पाठोपाठ आलेला पहिला कॅन्सर !(lokmatbepositive@gmail.com)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य