हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 03:42 PM2016-12-28T15:42:59+5:302016-12-28T15:42:59+5:30

आपले शरीर सुदृढ व दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ब्रेकफास्ट हेल्दी असणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याचदा ब्रेकफास्टमध्ये नको त्या गोष्टींचा समावेश असतो, त्याकारणाने आपल्याला विविध व्याधींना सामोरे जावे लागते.

Want a healthy breakfast? | हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?

हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?

Next
ले शरीर सुदृढ व दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ब्रेकफास्ट हेल्दी असणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याचदा ब्रेकफास्टमध्ये नको त्या गोष्टींचा समावेश असतो, त्याकारणाने आपल्याला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. 

ब्रेकफास्टमध्ये काय टाळावे
टोस्ट - नाश्त्यात टोस्ट व जॅम सुद्धा खाऊ नये. यातील अवाजवी कार्बोहायड्रेट लठ्ठपणाला कारणीभूत ठरु शकते. 
ब्रेड - काही लोक नाश्त्यात ब्रेड खातात. ब्रेड हे मैदा किंवा अनेक दिवस जुन्या पीठापासून बनवलेले असते. त्यामुळे ब्रेड पचायला जड असते. 
आईसक्रीम - सकाळी-सकाळी आईसक्रीम व सॉस खाणे टाळावे. यामध्ये सुद्धा साखरेचे प्रमाण अधिक असते
नूडल्स - काही लोक घाई-गडबडीत नाश्त्यात नूडल्स बनवून खाऊन घेतात. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. नूडल्समधील सोडियम अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारे आहे.
पॅक्ड ज्यूस - नाश्त्यात बाजारातील पॅक्ड ज्यूस घेणे मुळीच योग्य नाही. यात मोठ्या प्रमाणात शुगर असते. असा ज्यूस घेतल्याने तुमची ब्लड शुगर लेवल वाढू शकते. म्हणून ज्यूस पिण्याऐवजी फळे खा. 

Web Title: Want a healthy breakfast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.