(Image Credit : YouTube)
ड्रायफ्रूट्स हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सर्वांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचे वेगवेगळे फायदे होतात. रोज मुठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरीराला वेगवेगळे पोषक तत्त्व मिळतात. ड्रायफ्रूट्समधील अक्रोडमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. अक्रोडचा त्या लोकांना अधिक फायदा होतो, जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
अक्रोडमध्ये असतात गुड फॅट
अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फॅट असूनही याने वजन कमी करण्यास मदत कशी होते? असा प्रश्न पडू शकतो. अक्रोडमधील गुड फॅट असतं, जे वजन वाढवण्याऐवजी वजन कमी करण्यास मदत करतं. एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, अक्रोड वजन करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अभ्यासकांनी लठ्ठपणा, डायबिटीस आणि मेटाबॉलिज्मवर एक रिसर्च केला.
या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी १० असा लोकांचा समावेश केला होता, ज्यांना डायबिटीस होता. यांना १ महिना वेगवेगळी डाएट देण्यात आली. जसे की, काही दिवस अक्रोड आणि स्मूदी, तर काही दिवस केवळ स्मूदी. त्यानंतर १ महिन्यांनी त्यांना नॉर्मल डाएट दिली गेली. दरम्यान अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी लोकांच्या ब्रेन अॅक्टिविटीमध्ये होणाऱ्या बदलांवर नजर ठेवली. यासाठी त्यांनी फंक्शनल मॅग्नेटिक रेजोनेंस इमेंजिग मशीनचा वापर केला.
काय आलेत निष्कर्ष?
या रिसर्चमधून दोन निष्कर्ष समोर आलेत. पहिला हा की, अक्रोड आणि स्मूदीनंतर सहभागी लोकांना भूक नॉर्मल स्मूदीच्या तुलनेत कमी भूक जाणवली. दुसरा हा की, अक्रोड स्मूदीच्या ५ दिवसांनंतर सहभागी लोकांच्या ब्रेन अॅक्टिविटीमध्ये फरक होता. अभ्यासकांनुसार, अक्रोड भूक कंट्रोल करण्यात मदत करतात. याप्रकारे वजन कमी करण्यास मदत मिळते.
वजन कमी करण्यात कसा होतो फायदा?
1) मोनोअनसॅच्युरेडेट फॅच असलेले इतर नट्सच्या उलट अक्रोडमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. हे गुड फॅट असतात. याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं आणि शरीराचं आरोग्य अधिक चांगलं होतं.
२) अक्रोडमध्ये असलेल्या अल्फा-लिनोलेनिक अॅसिड किंवा एएलए(ओमेगा-२ फॅटी अॅसिडचं एक रूप) हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ओळखलं जातं. याने शरीराला लवकर फॅट बर्न करण्यासाठी प्रेरणा मिळते.
३) असे मानले जाते की, अक्रोड मेंदूतील राइट-इंसुला या भागाला उत्तेजित करतं. मेंदूचा हा भाग भूक नियंत्रित करतं.
४) जर्नल न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित एक रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, दर व्यक्ती अक्रोडमधील ३०० कॅलरीज दररोज घेतील, तर ते अधिक चांगल्याप्रकारे वजन कमी करू शकतात.
५) एलाजिक अॅसिड नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट सूज कमी करण्याचं काम करतं आणि आतड्या निरोगी ठेवतं. याने पचनक्रिया सुधारते. तसेच अतिरिक्त कॅलरी आणि फॅट वेगाने नष्ट करतं.