शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बंद एसी सुरू करताय? थोडं थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 10:46 IST

धूलिकणांसह जंतूंमुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती

- सचिन लुंगसे मुंबई : पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने एसीचा वापर तुलनेने कमी केला जातो. किंवा एसी बंद ठेवला जातो. मात्र पावसाळा आणि हिवाळा संपल्यानंतर मार्च महिन्यातच उन्हाचा तडाखा बसू लागल्यानंतर मागील काही महिने बंद ठेवलेला एसी पुन्हा सुरू केला जातो. परंतु एवढे महिने बंद असलेला एसी सुरू करताना त्यातील जाळी स्वच्छ करण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी, त्यातील धूलिकणांसह जंतूंमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते, असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले.मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरुवात होते. या काळात दमा, अ‍ॅलर्जी, रेस्पेटरी इन्फेक्शन, श्वसनाचा त्रास आणि काही प्रमाणात निमोनियाचा त्रास होतो. याचे मूळ कोठे आहे, यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले की, आपल्याकडे उन्हाळा वगळता पावसाळा आणि हिवाळ्यात एसी बंद ठेवला जातो. पावसाळा आणि हिवाळा संपला की उन्हाळ्यादरम्यान गारव्यासाठी एवढे महिने बंद ठेवण्यात आलेला एसी सुरू केला जातो. उन्हाळ्यादरम्यान एसी सुरू करताना तो स्वच्छ केला जात नाही. एसीला एक फिल्टर असतो. त्यातून बाहेरची हवा आत येत असते. यात धूळीचे कण साचलेले असतात. जेव्हा तुम्ही एसी सुरू करता तेव्हा येणाऱ्या भपक्यात साचलेले सगळे कण बाहेर येतात. परिणामी, अ‍ॅलर्जी, खोकला, सर्दीचे प्रमाण वाढते. न्यूमोनियाचा धोका वाढतो.

अचानक आलेली आठवण देते अ‍ॅलर्जीस आमंत्रणउकडायला लागले की गारेगार हवा हवीहवीशी वाटते. साहजिकच पावसाळा, थंडीच्या दिवसांत बंद केलेल्या एसीची अचानक आठवण येते. काहीही विचार न करता बरेच महिने बंद असलेला एसी पटकन चालू केला जातो. पण बराच काळ तो बंद असल्याने एसीत बाहेरची हवी आत घेणाºया फिल्टरमध्ये धूळीचे कण साचलेले असतात. एसी सुरू करताच ते हवेत पसरतात आणि अ‍ॅलर्जीस आमंत्रण मिळते, असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जाळी साफ करणे गरजेचेएसीच्या माध्यमातून लीजनेल्ला आणि असीनॅटोबॅक्टर हे दोन जंतू पसरतात. ते एसीचेच जंतू आहेत. या जंतूंमुळे न्यूमोनियाची लागण होते. परिणामी, उन्हाळा सुरू झाल्यावर तुम्ही एसी सुरू करण्यापूर्वी त्यातली जाळी बाहेर काढा. ती पाण्यात टाका. एक ते दोन तास भिजत ठेवा. ब्रशच्या माध्यमातून जाळी स्वच्छ करा. त्यानंतर तिला उन्हात एक दिवस वाळवा, म्हणजे ती निर्जंतुक होईल. त्यानंतरच तिचा वापर करून एसी सुरू करा. महत्त्वाचे म्हणजे दर महिन्याला जाळी झटकून स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण एसीमुळे इन्फेक्शन होऊ शकते, असेही अन्नदाते यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स