शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

दररोज कोवळे ऊन घ्या, अन्यथा 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:36 IST

व्हिटॅमिन डीची कमतरता, जी आपण सूर्यप्रकाशाने सहज पूर्ण करू शकतो, त्याचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसेच हाडे कमकुवत होतात.

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणे सर्वांनाच आवडते. दिवसाचा १५-२० मिनिटांचा सूर्यप्रकाश शरीरातील सुस्तपणा तर दूर करतोच पण शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता देखील पूर्ण करतो. आठवड्यातून दोन ते तीन दिवस १० ते १५ मिनिटे उन्हात बसून अनेक गंभीर आजार टाळता येतात.

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन डीची कमतरता, जी आपण सूर्यप्रकाशाने सहज पूर्ण करू शकतो, त्याचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसेच हाडे कमकुवत होतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार वाढू शकतो. अशा प्रकारच्या पहिल्या अभ्यासात, सहमरी येथील युनिसाच्या ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर प्रिसिजन हेल्थच्या संशोधकांना असे आढळून आले की व्हिटॅमिन डीची कमतरता हृदयविकारास कारणीभूत ठरते. संशोधनात असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते.

कोणत्या देशांतील लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जास्त असते ?अभ्यासानुसार, ऑस्ट्रेलियातील अंदाजे २३ टक्के लोक, यूएसमध्ये २४ टक्के आणि कॅनडात ३७ टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. भारतातही ७०-८० टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे आजार संशोधनानुसार, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर त्याच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. यासोबत केस गळणे, नैराश्य आणि चिंता ही देखील त्याची लक्षणे आहेत.

व्हिटॅमिन डीची कमतरता कशी पूर्ण करावी व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी, तुम्ही दररोज सकाळी १०-१५ मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. जर तुम्हाला सन टॅन होण्याची शक्यता असेल तर तुम्ही सूर्याकडे पाठ करून सूर्यप्रकाश घ्यावा. याशिवाय तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यात व्हिटॅमिन डी भरपूर आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारात मशरूम आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग