गृहराज्यमंत्र्यांची प्रादेशिक प्रयोगशाळेला भेट
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:24+5:302015-01-31T00:34:24+5:30
गृहराज्यमंत्र्यांची प्रादेशिक प्रयोगशाळेला भेट

गृहराज्यमंत्र्यांची प्रादेशिक प्रयोगशाळेला भेट
ग हराज्यमंत्र्यांची प्रादेशिक प्रयोगशाळेला भेटनागूपर : गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी रहाटे कॉलनी चौकातील प्रादेशिक न्याय प्रयोगशाळेला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. कोणतीही सूचना न देता गृहराज्यमंत्री धडकल्याने प्रयोगशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. डॉ. पाटील यांनी प्रयोगशाळेत येताच त्यांनी पाहणी सुरू केली. त्यावेळी तेथील यंत्रांचीही माहिती जाणून घेतली. नादुरुस्त यंत्र त्वरित दुरुस्त करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रयोशाळेला आधुनिक करण्याच्या संदर्भातही त्यांनी यावेळी चर्चा केली. न्यायालयीन प्रक्रियेसाठी व पोलिसांच्या दृष्टीने एखाद्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नमुन्यांचे अहवाल लवकरात लवकर कसा मिळेल, यावर विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी सुचविले. यावेळी त्यांच्यासोबत प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. नितीन सुटके होते. त्यांनी मंत्र्यांना प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीशी अवगत केले. या भेटी दरम्यान चारही विभागाचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. प्रलंबित नमुन्याचा अहवाल लवकर तयार करण्याची ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. गृहराज्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीची आरोग्य विभागासह शासकीय रुग्णालयांत दिवसभर चर्चा होती.