दृष्टी कमजोर आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:37 IST2016-12-23T18:37:40+5:302016-12-23T18:37:40+5:30
आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश लोकांना चष्मा लागलेला दिसतो. चष्मा लागण्याचे कारण म्हणजे दृष्टी कमजोर होणे होय. यासाठी खाली काही सोपे उपाय दिले आहेत जे आपणास फायदेशीर ठरतील.

दृष्टी कमजोर आहे का?
आ लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश लोकांना चष्मा लागलेला दिसतो. चष्मा लागण्याचे कारण म्हणजे दृष्टी कमजोर होणे होय. यासाठी खाली काही सोपे उपाय दिले आहेत जे आपणास फायदेशीर ठरतील.
* डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे खूपच फायदेशीर आहेत. याचे नियमित सेवन केल्याने आपल्याला फरक जाणवेल.
* नियमित डोळ्यांचा व्यायाम केल्यानेही कमजोर दृष्टीस फायदा होतो. यासाठी डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली कडे फिरवा.
* दर तीन ते चार तासाच्या फरकाने आपले डोळे काही मिनिटांसाठी बंद करा. ही प्रक्रिया नियमित अमलात आणल्याने डोळ्यांना आराम मिळेल.
* आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केद्रिंत करा. या व्यतिरिक्त आपण भीतींवर एखाद्या बिंदूवरही लक्ष केंद्रित करू शकता. हळू-हळू याची प्रॅक्टिस वेळ वाढवा.
* दिव्याचा ज्योतीला एकटक बघत राहण्याच्या प्रक्रियेला त्राटक असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.
* डोळ्यांचे स्नायू स्वस्थ ठेवण्यासाठी डोळ्यांची मसाज आवश्यक आहे. विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.
* अंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला.
* झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवून द्यावे. झोपण्याच्या २ तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.
* सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला.