शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहार न करता या गोष्टींमधूनही मिळतं भरपूर प्रोटीन, शाहाकारी लोकांसाठी बेस्ट पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 09:42 IST

Vegetarian Protein Food : अनेकांना हेच वाटतं की, प्रोटीन फक्त मांसाहार करूनच मिळतं. मात्र, असं काही नाहीये. प्रोटीन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमधून मिळतं. चला जाणून त्या गोष्टी....

Vegetarian Protein Food : शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला प्रोटीन हे पोषक तत्व मिळणं फार गरजेचं असतं. शरीराच्या विकासात प्रोटीनची मोठी भूमिका असते. प्रोटीन शरीरात नवीन पेशी आणि हार्मोन्स तयार करण्याचं काम करतं. प्रोटीनमुळे शरीरात लाल रक्तपेशीची निर्मिती, सामान्य मेटाबॉलिज्म तयार होतं. पण अनेकांना हेच वाटतं की, प्रोटीन फक्त मांसाहार करूनच मिळतं. मात्र, असं काही नाहीये. प्रोटीन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमधून मिळतं. चला जाणून त्या गोष्टी....

1) बदाम

बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यात फायबर, व्हिटॅमिन ई, मॅगझीन आणि मॅग्नेशिअम हे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. २८ ग्रॅम बदामांमध्ये १६१ कॅलरीसोबतच ६ ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे तुम्ही बदामाचं नियमित सेवन करून प्रोटीन मिळवू शकता. 

2) ओट्स

ओट्स आजकालच्या आहारातील महत्वाचा भाग झालं आहे. यात फायबर, मॅग्नेशिअम, मॅगझिन, थियामिन(व्हिटॅमिन बी १) आणि इतर पोषक तत्वे असतात. अर्धा कप ओट्समध्ये ३०३ कॅलरीसोबत १३ ग्रॅम प्रोटीन असतं. नाश्त्यात तुम्ही याचं नियमित सेवन करू शकता.  

3) ब्रोकोली

ब्रोकोली एक फारच आरोग्यदायी भाजी आहे. यातून शरीराला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात मिळतं. याने कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो. ब्रोकोलीमध्ये वेगवेगळे बायोअॅक्टिव पोषक तत्वही भरपूर प्रमाणात असतात. एक कप ब्रोकोलीमध्ये केवळ ३१ कॅलरी आणि ३ ग्रॅम प्रोटीन असतं. 

4) भोपळ्याच्या बीया

बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, भोपळ्याच्या बीया आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात.कारण यात आयर्न, मग्नेशिअम आणि झिंकसहीत आणखीही काही पोषक तत्वे असतात. प्रोटीनबाबत सांगायचं तर २८ ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये १२५ कॅलरीसोबत ५ ग्रॅम प्रोटीन आढळतं.

5) डाळी 

डाळींमध्ये प्रोटीन भरपूर असतं. अर्धा कप पिवळ्या किंवा हिरव्या डाळीमध्ये जवळपास 8 ते 9 ग्रॅम प्रोटीन असतं. प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही मूग, मसूर आणि चण्याच्या डाळीचं सेवन करू शकता. 

6) हिरवे वाटाणे

हिवाळ्यात प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही हिरव्या वाटाण्याचं सेवन करू शकता. 100 ग्रॅम वाटाण्यांमध्ये 5.4 ग्रॅम प्रोटीन असतं. याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य