शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Vaccine 'only way' to end pandemic : 'या' मार्गानं होणार कोरोना महामारीचा अंत; १०४ वर्षीय आजींनी सांगितला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:11 IST

Vaccine 'only way' to end pandemic : या आजींची नात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे तिनं आजींना लसीकरणाचं महत्व पटवून दिलं होतं.  

कोरोनाच्या माहामारीनं गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे. गेल्यावर्षी  जसजसे लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत होते तसतसं कोरोनाची भीती लोकांच्या मनातून कमी होत होती. पण आता पुन्हा कोरोनाच्या उद्रेकानं चिंताजनक वातावरण पसरलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? अशी भीती लोकांच्या मनात आहे. लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर कोरोनाचा वेग कमी होईल असा अंदाज लावण्यात आला होता. पण तसं काही झालेलं नाही. त्यामुळे कोरोनाची माहामारी नष्ट होणार तरी कधी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

रोममधील एका १०४ वर्षीय आजींनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. या आजी कोरोना लसीचा दुसरा डोस  घेणाऱ्या सगळ्यात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. कोरोनाचा पूर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी या आजींनी दोन्ही डोस घेतले आहेत. बुशारेस्टच्या मुलांच्या पॅलेसमध्ये नातेवाईकांसमवेत त्या राहत आहेत. १९१६ मध्ये जन्मलेल्या झोइया बाल्टॅग यांनी रविवारी फाइजर लसीचा दुसरा डोस घेतला आणि माहामारीचा सामना करण्याचा हाच  एकमेव मार्ग असल्याचे जाहीर केले.

सावधान! हृदयाच्या आजारासाठी कारणीभूत ठरतात 'या'  ५ सवयी; सर्वाधिक तरूण होताहेत शिकार

''कोरोना व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी लस हा एकमेव पर्याय आहे. '' (Vaccine 'only way' to end pandemic) असं त्या यावेळी म्हणाल्या. या आजींची नात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे तिनं आजींना लसीकरणाचं महत्व पटवून दिलं होतं.  बाल्टॅग या स्पॅनिश फ्लूची माहामारी येण्याच्या २ वर्ष आधी जन्माला आल्या होत्या. 

चिंताजनक! 'या' वयोगटातील लोकांमध्ये दिवसेंदिवस अधिक वाढतोय कोरोना संसर्गाचा धोका; तज्ज्ञ सांगतात की....

आता कोरोना व्हायरसपासून बचावसाठी फायजरच्या लसीच्या पहिला डोस घेतल्यानंतरही त्यांच्यात कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले  नाहीत.  लसीकरणानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी या आजींचा सत्कारही केला. युरोपमधील बर्‍याच देशांप्रमाणेच रोमानियादेखील आता या व्हायरसशी लढा देत आहे. रविवारी देशभरात मोठ्या संख्येनं रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या