शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Weight loss tips: 'या' मसाल्याची पानं वापरा 'अशाप्रकारे', की तुमचं वजन कमी होईल पटापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 14:50 IST

आम्ही तुमच्यासाठी असे ३ उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया पुदिना वजन कमी करण्यासाठी कसा (Mint for Weight Loss Method) वापरायचा.

लठ्ठपणा (Obesity) ही सध्या संपूर्ण जगातील मोठी समस्या बनली आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, संपूर्ण जगात १.९ अब्ज लोक लठ्ठ आहेत. दरवर्षी ४० लाख लोकांचा लठ्ठपणामुळं अकाली मृत्यू होतो. लठ्ठपणा हे मधुमेह (Diabetes), रक्तदाब (high blood pressure), हृदयरोग (heart disease) यासारख्या घातक आजारांचे प्रमुख कारण आहे. वजन कमी करण्यासाठी पुदीनाही उपयुक्त ठरू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की पुदिन्याने तुम्ही वजन कसे कमी करू शकता? पण आम्ही तुमच्यासाठी असे ३ उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया पुदिना वजन कमी करण्यासाठी कसा (Mint for Weight Loss Method) वापरायचा.

मिंट आणि लिंबाचा रसझीन्यूजने दिलेल्या बातमीनुसार, पुदिन्याचे पाणी वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. परंतु, ते पिण्याची योग्य पद्धत समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही पुदिना आणि लिंबू यांचे मिश्रण बनवू शकता. पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या गोष्टी पुदिन्यात मिसळाशरीरातील नको असलेले घटक काढून टाकण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने आपले शरीर चांगले डिटॉक्स होईल. यासाठी अर्धे सफरचंद, डाळिंबाचे दाणे, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस एका ग्लास पाण्यात टाकू प्या. वजन कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

पुदिना आणि कोथिंबीरयाशिवाय पुदिन्यासोबत कोथिंबीरही मिक्स करू शकता. पुदिन्यासोबतच कोथिंबीरही वजन कमी करण्यास मदत करते. दोन्ही पानांचा एकत्र वापर केल्यास वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

पुदिन्याच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला मिळतील -

  • पुदिना औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.
  • वजन कमी करण्यासोबतच यामुळे अनेक आजार आपल्याला होणार नाहीत.
  • अपचन होत असेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता
  • निरोगी त्वचेसाठीही तुम्ही पुदिन्याचे पाणीही पिऊ शकता.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स