शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! फायझरच्या लसीचे साईड इफेक्ट दिसल्यानंतर CDC नं दिला सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 09:58 IST

CoronaVirus News & Latest Updates : सीडिसीने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना कोरोनाची लस दिली तसंच गंभीर लक्षणं दिसत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा लस  घेण्याआधी विचार करायला हवा.

ब्रिटननंतर आता अमेरिकेतही कोरोनाच्या लसीमुळे दोन आरोग्य कर्मचारी आजारी पडल्यामुळे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. युएस सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल आणि प्रिवेंशनने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण प्रकरणाची खोलवर तपासणी केली जात आहे. सीडीसीने धोक्याची सुचना देत सांगितले की, कोरोना व्हायरसची लस दिल्यानंतर ज्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसून आली त्यांना दुसरा डोस दिला जाणार नाही. 

सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार लस दिल्यानंतर तर एलर्जी थांबण्यासाठी औषधं द्यावी लागली, एपिनेफ्रिन दयावी लागली  किंवा व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली तर या स्थितीला रिएक्शनचे सिरीयस केस असं म्हटलं जात आहे. सीडिसीने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना कोरोनाची लस दिली तसंच गंभीर लक्षणं दिसत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा लस  घेण्याआधी विचार करायला हवा.

ज्या लोकांमध्ये लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. त्यांनी लस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. याआधी अमेरिकेत एलर्जी असलेल्या लोकांनाही लस देण्यात आली होती. अमेरिकेतील खाद्य आणि औषध प्रशासनाकडून या एलर्जीच्या प्रकारांवर परिक्षण केलं जात आहे. फायझर-बायोएनटेक कोरोनाची लस दिल्यानंतर अशा प्रकारचे परिणाम दिसून आले होते.

अमेरिकेत आणीबाणीच्या वापरासाठी अधिकृत मोर्डनाची कोरोना लस देखील गंभीर एलर्जीक लोकांना देण्यावर दोन दिवसांपूर्वी बंदी घालण्यात आली आहे. एफडीएने एक आदेश जारी केला आहे की असे म्हटलं आहे की, ही लस एलर्जीचा इतिहास असलेल्या लोकांवरही प्रतिकूल परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत, ज्यांना आधी एलर्जी झाली असेल त्यांना लस देऊ नये.

अलास्कामध्ये फायझरची कोरोनाची लस दिल्यानंतर दोन आरोग्य कर्मचारी आजारी पडले. त्याच्यावर लसीचे गंभीर एलर्जीक परिणाम झाले. लस दिल्यानंतर केवळ 10 मिनिटानंतर आरोग्य सेवकास एलर्जी झाली. अ‍ॅनाफिलेक्टिक लक्षणे अशा लोकांमध्ये आढळून आली आहेत. सुजलेली जीभ, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या समस्यांचा समावेश आहे.

चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...

फायझर कंपनीने भारतीय युनिटने कंट्रोलर जनरल ऑफ इंडियन ड्रग्स (डीजीसीआय) कडून तातडीने फायझर / बायोएनटेक लस वापरायला परवानगी मागितली आहे. यूकेमध्ये ही लस मंजूर झाल्यानंतर, येत्या काही दिवसांत फायझर आणि बायनटेक यांना अन्य देशांमध्ये ही लस मंजूर होण्याची अपेक्षा आहे. 

पोटाच्या विकारांसह थकवा घालवण्यासाठी गुणकारी ठरतं सैंधव मीठ; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

भारतात असा कोणताही सरकारी डेटा नाही, जेणेकरुन कोणत्या रूग्णांच्या एलर्जीची माहिती मिळू शकते. अशा परिस्थितीत एलर्जीची शक्यता जास्त असलेल्या व्यक्तीस ही लस दिली गेली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका