समजून घ्या ‘कोरोना’; फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:20 AM2020-06-28T00:20:19+5:302020-06-28T08:15:39+5:30

या स्टेजमध्ये रुग्ण व डॉक्टरच्या हे लक्षात आले तर लवकर उपचार सुरु करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी ‘सायलेंट हायपोक्सिया’ची प्रक्रिया शरीरात सुरु झाली आहे, हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे ३ मिनिट वॉक टेस्ट.

Understand ‘corona’; Just walk for 3 minutes and test | समजून घ्या ‘कोरोना’; फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा

समजून घ्या ‘कोरोना’; फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा

Next

अमोल अन्नदाते

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर ‘सायलेंट हायपॉक्सिया’ म्हणजेच कुठल्याही लक्षणांशिवाय शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे, हे एक घातक लक्षण आहे. बरेचदा कोरोना संसर्गित झालेल्या व्यक्तीने पल्सऑक्सिमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासली तर त्यावर सुरुवातीला हे लक्षात येत नाही. म्हणजे शरीरातील ऑक्सिजन अजून कमी झालेले नसते, पण फुप्फुसांवर कोरोनाचा परिणाम सुरु झालेला असतो. म्हणजेच ऑक्सिजनची पातळी कमी होण्यासाठी आजार वाढण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झालेली असते. या स्टेजमध्ये रुग्ण व डॉक्टरच्या हे लक्षात आले तर लवकर उपचार सुरु करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी ‘सायलेंट हायपोक्सिया’ची प्रक्रिया शरीरात सुरु झाली आहे, हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे ३ मिनिट वॉक टेस्ट.

३ मिनिट वॉक टेस्ट कशी करावी?

  • चालण्याअगोदर १० ते १५ मिनिटे शांत बसून राहावे व पल्स आॅक्सिमीटरने शरीरातील आॅक्सिजनची पातळी आधी तपासावी. त्यानंतर टायमर लावून नॉर्मल वेगाने ३ मिनिटे चालावे. त्यानंतर परत आॅक्सिजनची पातळी मोजावी. चालण्याआधी व चालण्यानंतर आॅक्सिजनच्या पातळीमध्ये ३ ते ४ चा फरक असला किंवा ते ९४ च्या खाली असेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. असे असेल तर पुढील २४ तासांत आॅक्सिजनची पातळी अजून खाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ही धोक्याची घंटा समजावी.
  • ३ मिनिट वॉक टेस्ट कोणी करावी?
  • कोरोना संसर्ग झालेले
  • लक्षणविरहीत रुग्ण
  • सौम्य तसेच मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले
  • होम आयसोलेशनमध्ये असलेले
  • कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिला आहे पण अजून अहवाल आलेला नाही.
  • कोणी करण्याची गरज नाही ?
  • संपर्कात आलेले व क्वारंटाइनमध्ये असलेल्यांनी तसेच इतर कोणाचा संपर्क नसलेल्या सर्व सामन्यांनी नियमित ही टेस्ट करू नये.
  • ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी लगेच घाबरून जाऊ नये, कारण लवकर निदान झाल्याने पुढे बरेच उपचार करता येतात.
  • ३ मिनिट वॉक टेस्ट पॉझिटिव्ह पण कोरोनामुळे आॅक्सिजन घटल्याने नव्हे; तर इतर काही कारणे आहेत-
  • शरीरात हिमोग्लोबिन कमी असणे (अ‍ॅनिमिया), फुप्फुस आधीपासून आकसलेले असणे (फायब्रोसिस ), तीव्र स्वरूपाचा हृदयरोग.


(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: Understand ‘corona’; Just walk for 3 minutes and test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.