टीबीचं इन्फेक्शन हे काही लोकांमध्ये आयुष्यभरासाठी नसतं - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:06 AM2019-10-30T11:06:11+5:302019-10-30T11:06:33+5:30

Immunologic Tuberculosis म्हणजेच टीबीशी संबंधित नुकताच करण्यात आलेला एक रिसर्च समोर आला आहे.

Tuberculous infection is not life-long in most people says research | टीबीचं इन्फेक्शन हे काही लोकांमध्ये आयुष्यभरासाठी नसतं - रिसर्च

टीबीचं इन्फेक्शन हे काही लोकांमध्ये आयुष्यभरासाठी नसतं - रिसर्च

Next

(Image Credit : thelinknewspaper.ca)

Immunologic Tuberculosis म्हणजेच टीबीशी संबंधित नुकताच करण्यात आलेला एक रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चनुसार अनेक केसेसमध्ये टीबीशी संबंधित स्किन आणि ब्लड टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावरही प्रभावित व्यक्तीला टीबी हा आजार होत नाही. अभ्यासकांनुसार, याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचं स्ट्रॉंग इम्यून सिस्टीम असतं.

sciencedaily.com ने दिलेल्या वृत्तानुसार, या रिसर्चचे अभ्यासक पुढे सांगतात की, स्टॉंग इम्यून सिस्टीम म्हणजेच मजबूत रोगप्रतिकारक शक्तीमुळे ब्लड आणि स्किन टेस्ट टीबी पॉझिटीव्ह आल्यावरही काही लोकांना टीबी होत नाही. कारण त्यांच्या शरीरात हा आजार डेव्हलपच होऊ शकत नाही. असं इन्फेक्शन ऑर्गेनिजमच्या कारणाने होतं. याद्वारे मायक्रोबॅक्टेरियम टर्ब्यूक्लॉसिसला इम्यून सिस्टम द्वारे नैसर्गिक पद्धतीने नष्ट करून शरीराच्या बाहेर केलं जातं. अशात हा आजार वाढत नाही.

द नॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अ‍ॅन्ड अदर नॉनप्रॉफिट ऑर्गनायझेशन अशाप्रकारच्या रिसर्चवर अनेक मिलियन डॉलर खर्च करतात. कारण आतापर्यंत झालेल्या टेस्टमधून हीच बाब समोर आली आहे की, टीबीचं इन्फेक्शन हे आयुष्यभर राहतं. ही माहिती युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनियाशी निगडीत आणि या रिसर्चचे सहलेखक पॉल एच. एडेलिस्टिन यांनी दिली. ते म्हणाले की, 'आमच्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, टीबी इन्फेक्शन रेअर कंडीशनमध्येच आयुष्यभर राहतं. तर साधारण ९० टक्के लोकांमध्ये हा आजार परतण्याचा आणि पुन्हा धोकादायक स्तरापर्यंत पोहोचण्याचा धोका अजिबात नसतो. 

या रिसर्चदरम्यान अभ्यासकांनी याआधीच्या काही रिसर्चचा वापर केला होता. ज्यात लोकांना प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट दिले गेले होते. यातील त्याच लोकांमध्ये याचं इन्फेक्शन सर्व्हाइव्ह करू शकलं ज्यांना एचआयव्हीची समस्या होती किंवा ज्यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं होतं.

या रिसर्चमधून अशीही बाब समोर आली आहे की, टीबीने ग्रस्त लोकांवर एक वर्षांपर्यंत उपचार केल्यावरही टीबीच्या अॅक्टिव्ह केसेस ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी केल्या होत्या. पण पुढील ९ वर्षात या लोकांच्या ब्लड आणि स्किन टेस्ट टीबी पॉझिटीव्ह आल्या. याने हे कळून येतं की, टीबीचं इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होण्याला ९ वर्षांचा कालावधीही लागू शकतो.


Web Title: Tuberculous infection is not life-long in most people says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.