तंबाखूने होते अन्न पचन, खा.गांधींचा दुसरा जावई शोध
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:06+5:302015-04-04T01:55:06+5:30
श्रीगोंदा : तंबाखू निर्यातीत भारताचा जगात दुसरा नंबर आहे. विडी व्यवसायावर दोन कोटी नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कॅन्सर हा नुसत्या तंबाखूने नव्हे तर वेगवेगळ्या कारणामुळे होतो. तंबाखूने अन्न पचन होते, अशी माहिती भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तंबाखूने होते अन्न पचन, खा.गांधींचा दुसरा जावई शोध
श रीगोंदा : तंबाखू निर्यातीत भारताचा जगात दुसरा नंबर आहे. विडी व्यवसायावर दोन कोटी नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कॅन्सर हा नुसत्या तंबाखूने नव्हे तर वेगवेगळ्या कारणामुळे होतो. तंबाखूने अन्न पचन होते, अशी माहिती भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.खा.गांधी हे आढळगाव येथे आले असताना त्यांना पत्रकारांनी छेडले. खा.गांधी पुढे म्हणाले, एनडीए सरकार काळात मी संसदेत तंबाखूवर आधारित उद्योग व त्याचे फायदे- तोटे यावर सात वेळा प्रश्न विचारला. यावेळी अन्न व औषधे मंत्री गुलाब नबी आझाद यांनी तंबाखूमुळे कॅन्सर होतो यावर भारतात अद्याप संशोधन झाले नाही असे सांगितले.केंद्र शासनाने तंबाखूचे फायदे तोटे याचा अभ्यास करण्यासाठी १५ संसद सदस्यांची कमिटी नेमली आहे. या कमिटीचा अहवाल काय येतो त्यानंतर खरे कळणार आहे. मी संसदेत नुसत्या तंबाखूने नव्हे तर इतर कारणाने कॅन्सर होतो, असे बोललो परंतु माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.अण्णा हजारेंना टोलातंबाखू व्यवसायाबाबत अमेरिकेत परिस्थिती वेगळी आहे. भारतात परिस्थिती वेगळी आहे. आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करणारे निर्णय घ्यावे लागतात परंतु काही समाजसेवकांची काही झाले तरी उठाठेव सुरू होते, असा टोला समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव न घेता खा.गांधींनी लगावला.