शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आधीच एखाद्या आजाराने ग्रस्त असाल; तर कोरोनापासून 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 17:15 IST

जे लोक सुरूवातीपासून कोणत्याही आजारांचे शिकार आहेत अशा लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. 

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अशात कोरोनाच्या प्रसाराबाबत आणि बचावाबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जे लोक सुरूवातीपासून कोणत्याही आजारांचे शिकार आहेत अशा लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. 

कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू होत असलेल्या लोकांमध्ये ७० टक्के लोक वयस्कर आहेत. तसंच कॅन्सर, हृदय विकार , रक्तदाबाच्या समस्यांनी पीडीत आहे. जर तुमच्या घरात सुद्धा वयस्कर व्यक्ती  असून एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे तुम्हाला कोरोना व्हायरसपासून लांब राहता येईल.

आपली औषधं न चुकता घ्या

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे  तुम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही आधीपासून डायबिटीस किंवा हृदयांसंबंधी काही आजार असेल तर आपल्या गोळ्या, औषधं नियमितपणे घ्या. कंटाळा करू नका. डॉक्टरांच्या संपर्कात राहा. फोनवरून डॉक्टरांचा सल्ला  घ्या.  काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना विचारून मगच औषधं आणि गोळ्या घ्या. 

गरज असेल तरच घराबाहेर पडा

तुम्ही कोणत्याही गंभीर समस्येचे शिकार असाल तर  घराबाहेर न पडणंच उत्तम ठरेल.  कारण  आजारांचा सामना करत करत सतत  औषधं गोळ्या घेऊन रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. अशा स्थितीत घराबाहेर पडल्यास संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका असू शकतो.

व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या टिप्स वापरा

घरातील व्यक्तीपासून २ मीटर अंतर ठेवा. 

आपल्या गोळ्या औषध आणि गरजेचे साहित्य मागवण्यासाठी घरातील एखाद्या तरूण व्यक्तीला पाठवा.

सतत स्वतःचे हात धुत राहा आणि साबण किंवा एल्कोहोल सॅनिटायजरचा वापर करा. 

तुम्ही स्वतःच्या तोंडाला, नाकाला आणि डोळयांना जितका कमी स्पर्श कराल तितकं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.( हे पण वाचा-CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू)

रेड झोन किंवा कंटेनमेंट झोनमध्ये राहत असाल तर कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नका. ऑनलाईन सामानाची खरेदी करा. (हे पण वाचा-औषध की लस, कोणता आहे कोरोनाचा प्रभावी उपाय; माहीत करून घ्या दोघांमधील फरक)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या