CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:19 PM2020-05-08T15:19:56+5:302020-05-08T15:53:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भविष्यात कोरोना शारीरिक संबंधांच्या माध्यमातून पसरू शकतो, असे शास्त्रज्ञ म्हणाले.

Coronavirus study confirms sperm containing virus raises risk of covid 19 spread via sex myb | CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू

CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लस, औषध शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कोरोना शारीरिक संबंधांमुळे पसरत नाही असं तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, कोरोनाबाधित रुग्णानं कोणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. पुरूषांच्या स्पर्म्समध्ये कोरोना व्हायरस सापडल्यामुळे चीनमध्ये निरोगी रुग्णांनाही शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोना संक्रमित पुरुषांसोबत सेक्स केल्यानंतर व्हायरस पसरण्याचा धोका असल्याची शक्यता चीनमधील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. चीनमधील च्या शांगक्यू या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३८ पुरुषांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. यापैकी ६ जणांच्या स्पर्ममध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं होतं. मात्र ते निरोगी झाले होते. काही दिवसांनंतर त्यांच्या स्पर्ममध्ये पुन्हा कोरोना आढळून आला. दरम्यान चीनच्या शास्त्रज्ञांनी याबाबत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप याबाबत ठोस पुरावे सापडलेले नाहीत. 

रॉयटर्सने याविषयीचा नेटवर्क ओपनचा अहवाल प्रसिद्ध केला आहे, यात चीनमधील शास्त्रज्ञांनी अद्याप आम्हाला याबाबत ठोस पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. मात्र काहींच्या स्पर्म्समध्ये कोरोना असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आणखी काही रुग्णांची तपासणी आम्ही करणार आहोत. भविष्यात कोरोना शारीरिक संबंधांच्या माध्यमातून पसरू शकतो, असे देखील शास्त्रज्ञ म्हणाले.

या अभ्यासाबाबत आम्हाला ठोस पुरावे सापडलेले नाहीत. मात्र ही शक्यता नाकारता येत नाही. स्पर्ममध्ये किती प्रमाणात कोरोना आहे, याचा आम्हीदेखील शोध घेत आहोत. स्पर्म्समध्ये किती काळ कोरोना सक्रिय राहू शकतो. त्याचे परिणाम कसा होऊ शकतो, याचा अभ्यास सुरु असल्याची माहिती ब्रिटनच्या शेफील्ड विद्यापीठाचे प्राध्यापक एलन पैसी यांनी दिली .(हे पण वाचा- लॉकडाऊनमुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर 'असा' होत आहे परिणाम)

बेलफास्टच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या प्रजनन औषधांचे अभ्यासक शीना लुईस यांनी याबद्दलचा अभ्यास अपूर्ण असल्याचे सांगितले. सध्या यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. पण पुरुषांच्या स्पर्म्समध्ये विषाणूचा धोका असू शकतो असं त्या पुढे म्हणाल्या. (हे पण वाचा-औषध की लस, कोणता आहे कोरोनाचा प्रभावी उपाय; माहीत करून घ्या दोघांमधील फरक)

 

Web Title: Coronavirus study confirms sperm containing virus raises risk of covid 19 spread via sex myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.