शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Weight loss tips: विकेंड आला की... 'या' चुका करणं टाळा, अन्यथा तुमची सर्व मेहनत जाईल वाया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 08:06 IST

जे लोक आपल्या फिटनेसची पूर्ण काळजी घेत आठवड्याभरात कठोर परिश्रम करतात, ते देखील वीकेंडला ब्रेक घेतात. परिणामी, शुक्रवारपेक्षा रविवारी किंवा सोमवारी त्यांचे वजन जास्त असते. त्यामुळे वीकेंडच्या काही सवयी तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा आणू शकतात. याकडे फक्त लक्ष देण्याची गरज आहे.

पाच दिवसांच्या व्यग्र आठवड्यानंतर अनेकांना वीकेंडला टीव्ही पाहताना आपल्या आवडत्या स्नॅक्सचा आनंद घ्यायचा असतो. सरासरी शहरी काम करणाऱ्या लोकसंख्येतील बहुतेक लोकांच्या बाबतीत असं होतं. जे लोक आपल्या फिटनेसची पूर्ण काळजी घेत आठवड्याभरात कठोर परिश्रम करतात, ते देखील वीकेंडला ब्रेक घेतात. परिणामी, शुक्रवारपेक्षा रविवारी किंवा सोमवारी त्यांचे वजन जास्त असते. त्यामुळे वीकेंडच्या काही सवयी तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा आणू शकतात. याकडे फक्त लक्ष देण्याची गरज आहे.

शनिवार-रविवार व्यायामाला ब्रेक -घ्यायला हरकत नाही, शरीराला तीव्र वर्कआउट्समधून (intense workouts) विश्रांतीची आवश्यकता असते. परंतु, जास्त वर्कआउट्समधून ब्रेक घेतल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही शारीरिक हालचाली अजिबात करू नये. जड डंबेल उचलण्यासाठी किंवा पुशअप करण्यासाठी तुम्हाला घाम गाळण्याची गरज नाही. त्याऐवजी, आपण किमान धावण्यासाठी जाऊ शकता किंवा उद्यानात फिरू शकता.

भरपूर खाणे -जास्त खाणे किंवा अनियमित खाणे हे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. वीकेंडमध्ये लोक जास्त खातात. आवडत्या पदार्थांचा आपल्याला आस्वाद घ्यायचा असतो. अनेकांना टीव्ही किंवा चित्रपट पाहताना काहीतरी खाण्याचा आनंद घ्यायचा असल्यास, तुमच्या स्नॅक्सवर लक्ष ठेवा. चिप्स आणि वेफर्स सारख्या अस्वास्थ्यकर अन्नापासून दूर रहा. त्याऐवजी, आपण हेल्दी गाजर आणि काकड्यांचा (सलाड) आस्वाद घेऊ शकता.

नाश्ता टाळणे -आठवड्याचे शेवटचे दिवस निश्चितच विश्रांतीचा दीर्घ कालावधी असतो आणि असे करताना आपण अनेकदा उशिरा उठतो. काहीजण दुपारपर्यंत झोपतात, त्यामुळे नाश्ता पूर्णपणे चुकतो. याचा परिणाम केवळ चयापचयावर होत नाही तर रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार देखील होतो. न्याहारी हे दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे आणि म्हणूनच त्यात प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर असणे आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स