शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

व्हिटॅमिन्सचे फायदे माहीत असतीलच आता किडनीला होणारे नुकसानही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 10:28 IST

How To Keep Kidney Healthy: बरेच लोक व्हिटॅमिन्सच्या सप्लीमेंट्स घेतात जे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कोणत्याही गोष्टी कमी किंवा अति ही नुकसानकारकच असते. तेच व्हिटॅमिन्सबाबत म्हणता येईल.

How To Keep Kidney Healthy: सामान्यपणे व्हिटॅमिन्स शरीरासाठी फार महत्वाचे असतात. वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सचे वेगवेगळे फायदे होतात. पण कधी कधी हे व्हिटॅमिन नुकसानकारकही ठरू शकतात. लघवीसंबंधी समस्या, थकवा, खाज, वजन कमी होणं किंवा भूक न लागणं यांसारख्या समस्या होत असतील आणि त्यात तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काही व्हिटॅमिन्स घेत असाल तर नुकसान होऊ शकतं. कारण या समस्या किडनीशी संबंधित असतात. अशात काही व्हिटॅमिन्सची हाय लेव्हल किडनी लवकर खराब करू शकतात. बरेच लोक व्हिटॅमिन्सच्या सप्लीमेंट्स घेतात जे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कोणत्याही गोष्टी कमी किंवा अति ही नुकसानकारकच असते. तेच व्हिटॅमिन्सबाबत म्हणता येईल.

किडनी खराब झाल्याची लक्षण

लघवीत फेस तयार होणे, जास्त किंवा कमी लघवी येणे, त्वचेवर खाज येणे, सतत थकवा राहणे, मळमळ किंवा भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे, श्वास भरून येणे, उलटी, हाय-पाय-टाचांमध्ये सून्नपणा, चांगली झोप न लागणे आणि शरीरातून दुर्गंधी येणे ही किडनी खराब होत असल्याचे किंवा डॅमेज झाल्याचे संकेत आहेत. अशात हे व्हिटॅमिन्स जास्त झाले तर किडनी डिजीज अधिक गंभीर होतो. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, या समस्या जास्त वाढल्याने किडनीचे नेफ्रोन डॅमेज होतात आणि किडनीची साइज लहान होऊ लागते. ज्याला किडनी म्हणतात.

जीवाला होऊ शकतो धोका

नॅशनल किडनी फाउंडेशनने सांगितलं की, जर तुमची किडनी खराब असेल आणि तुम्हाला यासंबंधी आजार असेल तर व्हिटॅमिन ए, ई आणि के सप्लीमेंट घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही शोधांनुसार, व्हिटॅमिन डी सुद्धा घातक आहे. यामुळे जीवालाही धोका होऊ शकतो.

व्हिटॅमिन ए

किडनीचा आजार झाला तर व्हिटॅमिन ए ची लेव्हल जास्त आढळू शकते. याचं सेवन कमी केल्यानेही टॉक्सिटी बनू शकते. यामुळे कमी दिसणे, हाडांमध्ये वेदना, त्वचेमध्ये बदल, लिव्हर डॅमेज आणि मेंदुवर प्रेशर वाढू शकतं. अंडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या भाज्या-फळं, संत्री, मास्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं. 

व्हिटॅमिन ई

किडनीच्या गंभीर आजारात व्हिटॅमिन ई जमा होऊन टॉक्सिटी वाढू शकते. यामुळे ब्लीडिंग वाढू शकतं. सोबतच थायरॉइड, कमजोरी, इमोशनल इमोशनल डिसऑर्डर, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रॉब्लम इत्यादी समस्या होऊ शकतात. अशात व्हिटॅमिन ई चे सप्लीमेंट घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सीड्स, बदाम, अक्रोड, एवोकाडो इत्यादीमध्ये व्हिटॅमिन ई असतं.

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के च्या कमतरतेसारखंच व्हिटॅमिन के ची लेव्हल वाढणं घातक ठरू शकतं. जर किडनीच्या आजारात डायलिसिस सुरू असेल तर व्हिटॅमिन के टॉक्सिटीचा धोका बनू शकतं. पालक, केळी आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के भरपूर असतं.

व्हिटॅमिन डी

सप्लीमेंटमुळे शरीरात व्हिटॅमिन जास्त वाढू शकतं. याने कॅल्शिअमचं अवशोषण फार जास्त वाढतं. किडनीच्या रूग्णांमध्ये कॅल्शिअम जमा होऊन स्टोन होऊ शकतो. हे व्हिटॅमिन उन्हापासून, दूध, कोड लिव्हर ऑइल, मासे, अंडी आणि मशरूममधून मिळतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य