'या' कारणांसाठी खा खजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:38 IST2017-03-06T04:21:14+5:302018-04-03T14:38:35+5:30

खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो. खरजूमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते.

For these reasons, eat dates | 'या' कारणांसाठी खा खजूर

'या' कारणांसाठी खा खजूर

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो. खरजूमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यवर्धक टॉनिक मिळण्यास मदत होते. मधुमेह (डायबेटीस) लोकांसाठी खजूर चांगले. खजूरमध्ये २३ कॅलरीज मिळतात. तसेच खजूरमध्ये कोलेस्ट्रोल नसतात. तसेच कर्करोग (कॅन्सर), हृदय रोगांसाठी खजूर एक वरदान आहे. 

याचे काय  फायदे आहेत?
१. तात्काळ ताकद मिळते 
खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक मात्रा असतात. ग्लुकोज, फळातील साखर प्रमाण असते. त्यामुळे खजूर खाण्यामुळे याचा शरीराला लाभ होतो. दोन ते चार खजूर खाल्ले तर आपल्याला एनर्जी मिळते.

२. वजन वाढविण्यास मदत 
आपले वजन वाढत नसेल. तुमची देहएष्टी किरकोळ असेल तर  वजन वाढविण्यासाठी खजूर मदत करतो. व्हिटॅमिन आणि प्रोटीन (प्रथिने) जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते. बारीक असणाऱ्या व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढेल.

३. हाडे मजबूत होण्यास मदत
खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

४. कफपासून मुक्तता
ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार खजूर रात्री पाण्यात  भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर खा. आपल्याला काही दिवसात याचा फायदा लक्षात येईल.

५. त्वचा चमकते
खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते.चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

6. हाडांच्या आरोग्य सुधारणा :
खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते. तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्‍त असते.

7. त्वचा उजळते :
खजूर खल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. शिवाय, आपल्या आहार खारका असतील तर  कोणत्याही त्वचाची समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते. 
8.पचन प्रकिया चांगली राहते :
रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खल्यास ते आरोग्यासाठी चांगले. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.

9. बद्धकोष्ठता दूर करते 
जर तुम्ही बद्धकोष्ठतेवर उपाय शोधत असाल तर खजूर खाणे फारच हितकारक आहे. खजुरामध्ये विद्राव्य फायबर असतात जे पोट साफ करण्यासाठी उपयोगी ठरतात.

10. गरोदरपणात उत्तम 
अनेक संस्कृतींमध्ये स्त्रीला गरोदरपणात खजुराचे सेवन करायला दिले जाते खजुरामध्ये असणारे आयर्न आणि खजुराची शक्ती प्रदान करण्याची क्षमता यामुळे गरोदर स्त्रियांसाठी खजूर उत्तम आहेत.

Web Title: For these reasons, eat dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.