शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Antibiotics औषधांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 11:22 IST

शरीर आतून मजबूत रहावं आणि कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.

वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी आजकाल जास्तीत जास्त डॉक्टर अ‍ॅंटी-बायोटिक्स औषधे देतात. काही रूग्णांना तर अनेक दिवस ही औषध घ्यावी लागतात. ज्या लोकांना जास्त दिवसांसाठी अ‍ॅंटी-बायोटिक्सचं सेवन करावं लागतं त्यांच्या शरीरात वेगवेगळे साइड इफेक्ट्स दिसू लागतात. जसे की, त्यांना पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होतात, इम्यून सिस्टीम कमजोर होतं आणि शरीरासाठी आवश्यक गुड बॅक्टेरियाही कमी होतात. अशा रूग्णांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. जेणेकरून शरीर आतून मजबूत रहावं आणि कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.

प्रोबायोटिक

दह्याचं सेवन केल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. कारण या प्रोबायोटिक्स म्हणजे गुड बॅक्टेरिया असतात जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. दह्याने पोट थंड राहतं. त्यामुळे तुम्ही दह्याचं सेवन नियमितपणे केलं तर अ‍ॅंटी-बायोटिक्सचं प्रभाव कमी करण्यास मदत मिळू शकेल.

फायबर

फायबरचं प्रमाण भरपूर असलेल्या पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. अशात फायबर मिळवण्यासाठी तुम्ही केळी, ओट्स, कांदा, लसूण आणि बडीशेप यांचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. या गोष्टींमुळे शरीरात गुड बॅक्टेरिया वाढतात आणि पचन तंत्र चांगलं ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल. 

हायड्रेशन

अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा कमी प्रभाव कमी करण्यासाठी शरीरात भरपूर पाणी असणं गरजेचं आहे. तसंही एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. दिवसातून किमान २ ते ३ लीटर पाणी सेवन केलं पाहिजे.

हर्बल टी

हर्बल टी चं सेवन करूनही तुम्ही अ‍ॅंटी-बायोटिकचा प्रभाव कमी करू शकता. यासाठी तुम्ही लेमन टी, मिंट टी, जिंजर टी चं सेवन करू शकता. यात अ‍ॅंटी-ऑक्टिडेंट्स भरपूर असतात. जे फ्री रॅडिकल्सच्या वाईट प्रभावापासून आपला बचाव करतात.

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स

शरीराचा वाईट प्रभावांपासून बचाव करण्यासाठी पोषक तत्व फार महत्वाचे ठरत असतात. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश करायला हवा. तुम्हाला व्हिटॅमिन सी संत्री, लिंबू, टोमॅटो आणि आवळे आणि वेगवेगळ्या बेरीजमधून मिळेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य