शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'या' पदार्थांमुळे तुमची हाडे होतात कमजोर, जाणून घ्या कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 11:45 IST

मजबूत हाडांसाठी आहारातून कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी घेण्याची गरज असते हे सर्वांना माहीत आहे. पण काही असेही पदार्थ आपल्या खाण्यात येतात ज्यांमुळे हाडे कमजोर होतात.

मजबूत हाडांसाठी आहारातून कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी घेण्याची गरज असते हे सर्वांना माहीत आहे. पण काही असेही पदार्थ आपल्या खाण्यात येतात ज्यांमुळे हाडे कमजोर होतात. वेगवेगळ्या पदार्थांमधून असे काही तत्व आपल्या शरीरात जातात की, त्यांनी हाडे कमजोर होतात. चला जाणून घेऊ त्या तत्वांबाबत...

सोडियमचं अधिक प्रमाण

मिठामुळे शरीरातील सोडियमचची कमतरता पूर्ण होते. पण जास्त सोडियन सुद्धा शरीरासाठी हानिकारक होऊ शकतं. सोडियमच्या अधिक प्रमाणामुळे लघवीच्या मार्गातून कॅल्शिअम बाहेर जाऊ लागतं. त्यामुळे तुम्हाला जर हाडे निरोगी ठेवायची असेल तर आहारातून जास्त सोडियम सेवन करु नये. 

अल्कोहोलही नुकसानकारक

अल्कोहोलचं अधिक प्रमाण हे शरीरासाठी घातक आहे. अल्कोहोल जास्त सेवन केल्याने हाडांचं नुकसान होतं. याचा प्रभाव हाडांवर इतका पडतो की, थोडासा झटका लागला तरी हाडे तुटू शकतात. 

प्रोसेस्ड फूड

प्रोसेस्ड फूडही हाडांसाठी फार हानिकारक आहेत. कारण या पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं आणि जास्त सोडियम हाडांसाठी चांगलं नसतं. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या बंद पॅकेटमधील फूड सेवन करणे टाळा.

बेकरी फूडनेही होतं नुकसान

बेकरी फूड टेस्टसाठी जरी चांगले असले तर यात शुगर आणि अनेकप्रकारचे हानिकारक तत्व असतात. जे शरीरातील हाडांना पोषक तत्त्व देण्याऐवजी त्यांना कमजोर करतात. त्यामुळे हाडांची काळजी घ्यायची असेल तर बेकरी फूड कमी प्रमाणात सेवन करा. 

कार्बोनेटेड ड्रिंक

कार्बोनेटेड ड्रिंक प्यायला टेस्टी असतात पण याचे शरीरावर अनेक गंबीर परिणामही होतात. याने हाडांचं आरोग्य बाधित होतं. या ड्रिंकमध्ये फॉस्फोरसचं प्रमाण अधिक असतं. याने कॅल्शिअम हाडांमधून बाहेर निघतं आणि हाडे कमजोर होतात. व्हिटॅमि एआपणा सर्वांना हे माहीत आहे की, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन किती महत्त्वाचे आहेत. खासकरुन व्हिटॅमिन ए दात, हाडे, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फार गरजेचं असतं. व्हिटॅमिन ए हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे हे खरं असलं तरी व्हिटॅमिन ए जास्त झालं तर व्हिटॅमिन डी वर मात करुन हाडांना नुकसान पोहोचवू शकतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स