शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दुधासोबत जर 'हे' पदार्थ खाल्ले तर होतील गंभीर आजार, अजिबात ट्राय करु नका हे कॉम्बिनेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 18:15 IST

या पदार्थांसोबत आणि फळांसोबत दूधाचं (Milk with Fruits) सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

जगभरात आज 1 जून रोजी ‘जागतिक दूध दिवस’ (World Milk Day 2022) साजरा केला जात आहे. चांगल्या आरोग्यासाठी दुधाचं महत्त्व आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील दुधाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दुधामध्ये कॅल्शिअमसह अनेक पोषक तत्त्वं असतात. दूध शरीरासाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे भारतातल्या बहुतांश घरांत दुधाचं सेवन केलं जातं. दूध हे आपल्या रोजच्या आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे. काहींना नुसतं दूध प्यायला आवडतं, तर काही जण वेगवेगळे फ्लेवर टाकलेलं दूध पिणं पसंत करतात.

दूध घालून आपण चहा (Tea), कॉफी पितो, त्याचा मिल्कशेक (Milk Shake) बनवतो. याशिवाय दुधापासून बनलेल्या अनेक पदार्थांचं आपण सेवन करतो. दूध शरीरासाठी चांगलं असलं तरी काही फळांसोबत त्याचं सेवन न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. या पदार्थांसोबत आणि फळांसोबत दूधाचं (Milk with Fruits) सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या संदर्भात 'आज तक'ने वृत्त दिलंय.

केळी आणि दूध एकत्र नकोबरेच लोक केळी आणि दुधाचं (Banana with Milk) एकत्र सेवन करतात. तसंच हे मिश्रण खूप आरोग्यदायी मानतात, परंतु आरोग्यतज्ज्ञांच्या मते केळी आणि दुधाचं एकत्र मिश्रण पचायला खूप वेळ लागतो. हे दोन्ही एकत्र घेतल्याने थकवा जाणवतो. त्यामुळे दूध आणि केळी यांचं मिश्रण करून त्याचं सेवन करू नये.

मासे आणि दूधदुधाचा गुणधर्म थंड असतो, तर मासे खाल्ल्याने शरीराचं तापमान वाढतं. दूध आणि मासे (Fish with Milk) या मिश्रणामुळे शरीरात असंतुलन निर्माण होतं आणि त्यामुळे शरीरात रासायनिक बदलही होऊ लागतात. मासे आणि दूध सोबत खाल्ल्यास पचनाचे विकार होतात आणि पोट जड होतं, त्यामुळे मासे आणि दुधाचं एकत्र सेवन करू नये.

मुळा आणि दूधआयुर्वेदानुसार मुळा खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. कारण मुळा उष्ण गुणधर्माचा असतो, त्यामुळे त्याचे दुधासोबत सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते, तसंच पचनाची क्रियाही बिघडते. तज्ज्ञांच्या मते, मुळा किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ खाल्ल्यानंतर दोन तासांनी दूध प्यायला हवं.

दुधाबरोबर आंबट पदार्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, दुधात आंबट किंवा आम्लयुक्त पदार्थ मिसळू नयेत. व्हिटॅमिन सी असलेली फळे दुधासोबत खाणं टाळा. त्यामुळे दूध पचायला वेळ लागतो. लिंबू किंवा कोणतंही आंबट चवीचं फळ दुधासोबत खाल्ल्यास कन्जेशन, सर्दी, खोकला, पुरळ आणि अॅलर्जीदेखील होऊ शकते.

फळांसह दुधाचं सेवन करू नयेकाही फळांसह दूध पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. दूध पोट साफ करण्याचं काम करतं, तर फळांमध्ये नैसर्गिक मीठ आणि पाणी असतं, जे किडनी (Kidney) स्वच्छ ठेवण्याचं काम करतं. ते एकत्र घेतल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात आणि शरीरातील विषारी पदार्थ वाढतात. त्यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे त्याचं एकत्र सेवन करू नये.

तुम्ही यापैकी कोणत्याही पदार्थांचं किंवा फळांचं सेवन दुधासोबत करत असाल, तर ते टाळा. कारण त्यामुळे आरोग्याच्या अनेक अडचणी उद्भवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स