शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

'ही' असू शकतात स्किन कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:29 IST

त्वचेच्या कर्करोगाची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.

 (Image Credit : Consulting Room)

त्वचेच्या कर्करोगाची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. त्वचेचा कर्करोग हा सतत त्वचा सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे होण्याची शक्यता असते. मुख्यत: केसांची त्वचा, चेहरा, ओठ, कान, मान, छाती, हात व विशेषत: महिलांचे पाय या अवयवांच्या त्वचेवर हा विकार होण्याची शक्यता अधिक असते. मेलनोमा हा त्वचेचा कर्करोग गडद रंगाची त्वचा असणाऱ्या लोकांमध्ये अधिक आढळतो. सर्व प्रथम तो एका मोल्सच्या रुपात आढळतो मात्र नंतर त्यांचे गंभीर कर्करोगामध्ये रुपांतर होते. बऱ्याचदा पुरुषांचे डोके व मान या अवयवांवर याचा अधिक प्रभाव आढळतो. तर स्त्रियांमध्ये हा विकार त्यांच्या पायाच्या खालच्या भागावर आढळतो. कधी कधी या रोगाचा प्रभाव हातपायांच्या नखांवर स्तनांवर, काखेत आढळतो. mayoclinic.org ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकदा त्वचेवर दिसणारी लक्षणं ही स्किन कॅन्सरची आहेत, हे समजणं शक्य होत नाही. आज आम्ही काही लक्षणं सांगणार आहोत, त्यामुळे ही लक्षणं आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. योग्य वेळी जर यावर उपचार केले नाहीत तर स्किन कॅन्सर जीवघेणाही ठरू शकतो. 

(Image Credit : Teen Vogue)

स्किन कॅन्सरची लक्षणं :

जळजळ होणं 

मान, कपाळ, गाल आणि डोळ्यांच्या आसपास अचानक जळजळ होऊ लागते. तेव्हा याकडे दुर्लक्षं करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतो. कारण कदाचित हे स्किन कॅन्सरचं लक्षणं ठरू शकतं. 

डाग 

जर तुमच्या त्वचेवर अचानक डाग आले असतील आणि ते बरेच दिवस जात नसतील तर हे देखील स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. चार किंवा पाच आठवड्यांपेक्षा जास्त दिवस हे डाग दिसत असतील तर हे अत्यंत घातक ठरू शकतं. त्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. 

बर्थ मार्कमध्ये बदल होणं 

स्किनमध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येतात. जसं तुमच्या शरीरावर अनेक बर्थमार्क असतील आणि त्यांचा आकार वाढू लागला किंवा खाज येत असेल तर स्किन कॅन्सर असण्याचा संकेत असू शकतो. 

त्वचेवरील तीळाचा आकार आणि रंग बदलणं 

तुमच्या त्वचेवर तीळ आहे आणि त्याचा अचानक शेप आणि रंग बदलला किंवा त्याच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग बदलला तर डॉक्टरां सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

पिंपल्सचा आकार वाढणं 

जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचा आकार वाढत असेल आणि त्याचा रंगही बदलत असेल तर स्किन कॅन्सर होण्याती शक्यता असते. 

एक्जिमा होणं

एक्जिमा म्हणजेच खाज येणं. हेदेखील स्किन कॅन्सरचं लक्षणं आहे. जर ही समस्या कोपर, हात किंवा गुडघ्यांवर दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्षं करू नका. डॉक्टरांता त्वरित सल्ला घ्या.

खाज येणं 

जर तुम्हाला उन्हामध्ये गेल्याने सतत खाज येत असेल तर हेदेखील स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. 

असा करा बचाव :

- घराबाहेर पडताना शरीरावर थेट सूर्यकिरणं पडणार नाहीत याची काळजी घ्या. 

- त्वचेवर अचानक डाग दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

- भरपूर पाणी प्या, ज्यामुळे स्किन कॅन्सर होण्याचा धोका वाढत नाही. 

- त्वचेवर लोशन, मॉयश्चरायझर इत्यादींचा वापर करा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :cancerकर्करोगSkin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स