शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! लहान मुलांमध्ये वाढतोय कॅन्सरचा धोका; जाणून घ्या, लक्षणं आणि उपाय, वेळीच व्हा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 11:36 IST

Cancer in Children : तरुणांनाच नव्हे तर आता चिमुकल्यांना देखील कॅन्सरने विळखा घातला आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण अधिक चिंताजनक आहे.

नवी दिल्ली - कॅन्सर हा अतिशय गंभीर आजार आहे. या आजाराबाबत वेळीच समजलं नाही तर या आजाराने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कॅन्सर होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, शरीरातील पेशी असामान्य झाल्या की कॅन्सर होतो. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये स्तनाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सरचा समावेश आहे. तरुणांनाच नव्हे तर आता चिमुकल्यांना देखील कॅन्सरने विळखा घातला आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण अधिक चिंताजनक आहे. मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या काही लक्षणांबाबत जाणून घेऊया...

लहान मुलांमध्ये आढळतात 'ही' लक्षणं 

- त्वचा पिवळसर होणे.- तोंडातून किंवा नाकातून रक्त येणे.- हाडं दुखणं- चालताना त्रास होणं- पाठदुखी- पोटात किंवा मांडीवर गाठ येणे- सकाळी उलट्या होणे- सतत ताप येणे- एकदम वजन कमी होणे- दिसण्याची क्षमता कमकुवत होते.

काही आजारांमुळे मुलांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. जसं की डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये ल्युकेमिया होण्याची शक्यता 10-20 पट जास्त असते. या शिवाय कॅन्सर हा काहीवेळा तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. जर तुम्हाला कॅन्सर असेल, तर तुमच्या मुलाला भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता असते. रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यांच्या कॅन्सर दुर्मिळ प्रकार आहे. मुलाला डोळ्यांचा त्रास असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. एका रिपोर्टनुसार, EVB हा लहान मुलांमध्ये एक सामान्य संसर्ग आहे. त्यामुळे मुलांमध्ये कॅन्सर पसरतो.

कॅन्सरपासून असा करा बचाव

- मुलांना कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी, विशेषतः स्वतःला आणि मुलाला धूम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनापासून दूर ठेवावे लागेल. - मुलांच्या रोजच्या आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. - बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा.- मुलांच्या त्वचेकडे तसेच मुलांच्या वजनाकडे विशेष लक्ष द्यावे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य