शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात वाढला ‘सायलेंट किलर’चा धोका ! मुलांमध्ये बीपीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:16 IST

सर्वेक्षणात हे प्रमाण ७.५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे निरिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आता मुलांनाही ग्रासू लागला आहे. अलीकडील संशोधनांनुसार देशातील ६ ते १८ वयोगटातील शालेय मुलांमध्ये हायपरटेन्शनचे आणि हाय ब्लड प्रेशरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मध्य भारतातील एका अभ्यासात सुमारे १.४ टक्के किशोरांमध्ये उच्च रक्तदाब आढळला आहे. तर महाराष्ट्रातील १० शाळांमधील २६०० हून अधिक विद्यार्थ्यांवर झालेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण ७.५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

सामान्य वजनाच्या मुलांनाही त्रास

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उच्च रक्तदाब ही समस्या फक्त लठ्ठ किंवा स्थूल असणाऱ्या मुलांमध्येच आढळते असे नाही, तर तर सामान्य वजनाच्या सुमारे ५ टक्के मुलांमध्येही रक्तदाब वाढलेला आढळून आला आहे.

हृदय व मूत्रपिंडावर होतोय परिणाम

अनेकदा मुलांमध्ये हायपरटेन्शनची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे हे आजारपण ‘सायलेंट किलर’ ठरत असून, हळूहळू हृदय आणि मूत्रपिंडावर परिणाम करू लागते. अभ्यासांनुसार, उच्च रक्तदाब असलेल्या सुमारे ४० टक्के मुलांच्या हृदयाच्या रचनेत सुरुवातीचे बदल दिसून आले आहेत. 

रक्तदाब का वाढतोय?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढती निष्क्रिय जीवनशैली, जास्तीचा स्क्रीन टाइम, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि असंतुलित आहार ही या वाढत्या रक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत. अधिक मीठ, तळलेले व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ मुलांच्या रक्तदाबाला धोकादायक पातळीवर नेत आहेत. विशेषज्ञांनी सुचवले आहे की, शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणीसह बीपी मापन अनिवार्य केले पाहिजे. वेळेवर निदान आणि जीवनशैलीतील बदल केल्यास या ‘सायलेंट किलर’पासून मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवता येऊ शकते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Silent Killer Threatens Children: BP Cases Rise Alarmingly Nationwide

Web Summary : High blood pressure is increasingly affecting children aged 6-18 due to lifestyle factors. Studies show a rise in hypertension among kids, even those with normal weight. Early detection and lifestyle changes are crucial to protect children from this silent killer which impacts heart and kidney health.
टॅग्स :Healthआरोग्यkidsलहान मुलं