Teenage मधील लठ्ठपणामुळे वाढू शकतो हार्ट फेलचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 11:06 AM2019-05-30T11:06:04+5:302019-05-30T11:13:02+5:30

वाढतं वजन ही अलिकडच्या काळात अनेकांना हैराण करणारी समस्या आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे.

Teenage obesity increase chances of heart failure in adulthood | Teenage मधील लठ्ठपणामुळे वाढू शकतो हार्ट फेलचा धोका!

Teenage मधील लठ्ठपणामुळे वाढू शकतो हार्ट फेलचा धोका!

वाढतं वजन ही अलिकडच्या काळात अनेकांना हैराण करणारी समस्या आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे. आणि याचे कारणेही वेगवेगळी असतात. अशातच वजन वाढलेल्या लोतांबाबत एका रिसर्चमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वीडनमधील एका रिसर्चनुसार, ज्या लोकांचं वजन टीनेजमध्ये अधिक असतं, त्यांच्यात रेअर टाइपची हार्ट मसल डॅमेज होण्याची समस्या दिसू शकते. ही मसल डॅमेज झाल्यास त्या व्यक्तीला हार्ट फेल होण्याची शक्यता असते.

(Image Credit : YouTube)

रिसर्चमध्ये स्वीडनमधील १.६ मिलियन लोकांचा उंची, वजन आणि फिटनेस संदर्भातील डेटा बघितला गेला. हे लोक स्वीडनमध्ये १९६९ आणि २००५ दरम्यान १८ ते १९ वयाचे असताना कम्पल्सरी मिलिटरी सर्व्हिसमध्ये सहभागी होते. सुरूवातीला केवळ १० टक्के लोक ओव्हरवेट आणि लठ्ठपणाचे शिकार होते. 

(Image Credit : Mirror)

२७ वर्षांच्या फॉलोअपनंतर ४ हजार ४७७ लोकांमध्ये कार्डिओमायोपॅथीची समस्या बघितली गेली. ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच रिसर्चमधून हे समोर आलं की, ज्या लोकांचं वजन टीनेजमध्ये अधिक होतं, त्यांच्यात कार्डिओमायोपॅथी होण्याचा धोका ३८ टक्के जास्त असतो.

(Image Credit : TVC News)

कार्डिओमायोपॅथीचे अनेक प्रकार असतात. पण याची कारणे अजून व्यवस्थित समजू शकलेली नाहीत. एकंदर काय तर याने हार्टची काम करण्याची क्षमता घटते. ज्यामुळे हार्ट ब्लड पम्प करू शकत नाही आणि हार्ट फेल होतो.

हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी उपाय

पुरेशी झोप 

हॉवर्डच्या ७० हजार महिलांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, झोप आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी जास्त फायद्याची आहे. या अभ्यासात आढळून आलं की, जे लोक रात्री एक तास अधिक झोप घेतात त्यांना हृदयाचे आजार इतरांच्या तुलनेत कमी असतात. तेच ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना हृदयाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. 

(Image Credit : Today Show)

कोलेस्ट्रॉल कमी करा

रक्तात अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल असणे फार घातक आहे. याने हृदयासंबंधी आजार होऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा आणि सतत तपासणी करत रहा. 

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम करणे वजन कमी राहण्यास मदत होते. यामुळे मधुमेह होण्याचीही शक्यता कमी असते. मधुमेह असलेल्या लोकांना हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते. 

(Image Credit : Cooking Light)

फॅटपासून दूर रहा

जेवणातील तेलाचं प्रमाण कमी करून ताज्या हिरव्या भाज्या आणि फळांचं सेवन वाढवा. यातून तुम्हाला अॅंटी-ऑक्सीडेंट्स मिळतात. यामुळे कोलेस्ट्रोलचा प्रभाव कमी होतो. रोज भाज्या खाल्यास हृदय निरोगी राहतं. सोबतच जंक फूडचं सेवनही कमी करा. वेळेवर जेवण करणे अधिक चांगले.

धुम्रपान करू नका

सिगारेट ओढणे महिलांच्या हृदयासाठी फारच घातक आहे. मध्यम वर्गातील महिलांना तंबाखूमुळे हार्टअटॅक येऊन जीव गमवावा लागण्याचं प्रमाण हे ५० टक्के आहे. धुम्रपानामुळे हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते. 

वजन नियंत्रित ठेवा

जर तुमचं वजन जास्त असेल तर तुमच्या हृदयावर अधिक दबाव पडतो. हृदयाचे ठोके अधिक वाढतात. वजन वाढण्याचं कारण असंतुलित आहार, व्यायाम न करणे हे आहेत. अशात इतरही काही गंभीर आजार होतात. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवा.

तणाव कमी करा

तणाव हार्ट अटॅक येण्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न हे तणाव कमी करण्यासाठी केले पाहिजे. त्यासोबतच रोजच्या आहारातही काही बदल करायला हवेत. 

मद्यसेवन कमी करा

मद्याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवनामुळे हाय बीपी आणि हृदयासंबंधी आणखीही आजार होतात. त्यामुळे मद्याचं सेवन कमी करणे हा उत्तम पर्याय आहे. 

Web Title: Teenage obesity increase chances of heart failure in adulthood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.