Tea and coffee : चहा हा अनेकांची कमजोरी असतो. म्हणजे काही लोकांना चहाची अशी काही तलब लागते की, त्यांना त्यावेळी चहा लागतोच. जर मिळाला नाही तर त्यांच्या हातून एकही काम नीट होत नाही. कॉफीबाबतही तसंच काहीसं सांगता येईल. चहा आणि कॉफीबाबत नेहमीच वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात. ज्यात वेगवेगळ्या गोष्टींचा दावा केला जातो. प्रमाणापेक्षा जास्त कॉफी किंवा चहा पिणं आरोग्यासाठी घातक असा दावा काही दिवसांआधी करण्यात आला होता. त्यात तथ्यही आहे. कारण कोणत्याही गोष्टीची अति ही नुकसानकारकच असते. अशात सध्या एक असा दावा करण्यात आला आहे, ज्याबाबत वाचल्यावर चहा-कॉफीच्या शौकीनांना आनंदच होईल. कारण एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, चहा किंवा कॉफी पिऊन जीवघेण्या ट्यूमरपासून बचाव केला जाऊ शकतो.
काही दिवसांआधीच अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने चहाला हेल्दी ड्रिंक असल्याचं म्हटलं होतं. चहाच्या शौकीनांसाठी ही आनंद देणारी बातमी होती. पण चहा जास्त पित असाल तर नुकसान नक्कीच होणार.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीवर असलेल्या रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, कॅफीनेटेड ड्रिंक प्यायल्यानं डोकं आणि मानेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. यात हेही सांगण्यात आलं आहे की, हा फायदा मिळवण्यासाठी किती कप चहा प्यावा?
कोणत्या कॅन्सरपासून बचाव?
चहा आणि कॉफीनं हेड अॅन्ड नेक कॅन्सरपासून सगळ्यात जास्त बचाव आढळून आला आहे. कॅन्सरचे हे प्रकार जगात सातवे सगळ्यात घातक मानले जातात तोंड आणि घशाच्या कॅन्सरमध्येही हे ड्रिंक फायदेशीर मानलं गेलं आहे. हा निष्कर्ष जगभरात करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमधून समोर आला आहे.
किती कप कॉफी-चहा फायदेशीर?
हा परिणाम अशा लोकांमध्ये आढळून आला जे रोज दिवसातून चार कप कॅफीनेटेड कॉफी पितात. यानं डोकं आणि मानेच्या कॅन्सरचा धोका १७ टक्के कमी आढळून आला. तेच तोंडात कीड लावण्याचा धोका ३० टक्के आणि घशाच्या कॅन्सरचा धोका २२ टक्के कमी आढळून आला.
याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुम्हाला केवळ कॅफीन असलेली कॉफीच प्यायची आहे. जर तुम्ही कॅफीन नसलेली कॉफीही प्याल तरीही तुम्हाला फायदा मिळेल. यानं ओरल कॅविटीचा धोका २५ टक्के कमी राहतो.
किती कप चहा पिणं योग्य?
रोज १ कप चहा पिणाऱ्यांमध्ये डोकं आणि मानेच्या कॅन्सरचा धोका ९ टक्के कमी आढळला. तेच हायपोफेरीन्जियल कॅन्सर (गळ्याच्या खालचा भाग) चा धोका २७ टक्के कमी होता. पण जर दिवसातून १ कपपेक्षा जास्त साखरेचा चहा प्यायल्यास लॅरींजिअल कॅन्सरचा धोका वाढतो.
चहा बनला हेल्दी ड्रिंक
काही दिवसांआधीच US FDA नं कॅमेल्लिया सिनेंसिसपासून तयार चहाला हेल्दी ड्रिंक घोषित केलं आहे. त्यांनी सांगितलं की, कॅमोमाइल, पेपरमिंट, आलं, लॅवेंडर, हिबिस्कस, बटरफ्लाय पी फ्लोवर किंवा मसाला चहाला या लिस्टमधून बाहेर ठेवलं आहे.