शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरचे पदार्थ चवीनं खाताय? पण या गंभीर आजारांची माहिती मिळाल्यावर जाल विसरुन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:36 IST

पावसाळ्यात रस्त्यावरचे चमचमीत पदार्थ दिसले की खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र हे पदार्थ म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण असते. या पदार्थांवर घाण, विषाणू, जीवजंतू, माश्या बसलेल्या असतात. त्यांच्यापासून आपणास खालील आजार होतात. या आजारांपासून कसे वाचावे याचे उपाय.

पावसाळ्यात रस्त्यावरचे चमचमीत पदार्थ दिसले की खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र हे पदार्थ म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण असते. या पदार्थांवर घाण, विषाणू, जीवजंतू, माश्या बसलेल्या असतात. त्यांच्यापासून आपणास खालील आजार होतात. या आजारांपासून कसे वाचावे याचे उपाय.

जुलाबजुलाब हा पावसाळ्यात उघड्यावरील दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. पोटात गुबारा धरणे / पोट फुगणेपोटात वात होणे, शौचास घाई होणे, पोट पूर्ण साफ झाले नाही असे वाटणे, शौचाच्या वेळी चिकट स्त्राव येणे ही याची लक्षणे आहेत.उपाय-शुद्ध पाणी, नारळपाणी, फळांचे रस, डाळीचे पाणी, लिंबूपाणी असे भरपूर दवपदार्थ प्यावेत. त्याचबरोबर 'ओआरएस'चाही आसरा घेता येतो. 'ओआरएस' म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन.

कावीळपावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे कावीळ होते. या आजारात डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. काविळीची लागण झाली की यकृतामध्ये बिघाड होतो. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते.उपाय-काविळीमध्ये काहीही खाण्याची आणि पिण्याची इच्छा मरुन जाते. पण या दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी तुम्हाला चांगला आहार घेण्याची देखील गरज असते. पण या दिवसात भूक लागत नाही. म्हणूनच तुम्ही मुळ्याचा रस आहारात घेणे आवश्यक असते. मुळ्याची पाने खुडून त्याचा रस प्यायलाने तुमचे पोट साफ होते आणि तुम्हाला भूक लागते. त्यामुळे किमान एक ग्लासभर तरी मुळ्याचा रस प्यावा.

फुड पॉईजनिंगपावसाळ्यात उघड्यावरील अरबट चरबट, चुकीचे, अनहेल्दी आणि अस्वच्छ पदार्थ खाल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे फायदेशीर ठरेल. गरम पाणी पिणे तर अधिक उत्तम. उपाय-जिऱ्याचा वापर पदार्थ स्वादिष्ट आणि सुगंधित बनवण्यासाठी केला जातो. रोज एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खाल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल. जिऱ्यामुळे पचनक्रीया सुधारते.

पावसाळ्यात अशी घ्याल पोटाची काळजीआपल्या आहारात फळे, पालेभाज्या या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल. ब्रोकोली, गाजर,  हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हळद ही औषधी वनस्पती असून यात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा. सर्दी व खोकल्यासाठी लसून अतिशय गुणकारी आहे. लसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत.ज्यामुळे अ‍ॅलर्जीला दूर पळविता येते.लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स